Breaking News

*चंद्रपूर येथे ऐतिहासिक ओबीसी चा विशाल मोर्चा*

*चंद्रपूर येथे ऐतिहासिक ओबीसी चा विशाल मोर्चा*


वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

चंद्रपूर – येथे 26 नोव्हेंबर ला ओबीसीं जनगणना झालीच पाहिजे या मागणी साठी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 52% असलेला ओबीसी वर्गाला त्यांच्या लोखंसंख्येप्रमाणे आरक्षण द्या या साठी मागील कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे .परंतु ओबीसी समाजाची मागील 70 वर्षांपासून जनगणना झालेली नाही ही मोठी शोकांतिका आहे .

ओबीसी समन्वय समिती तर्फे ओबीसी जनजागृती तसेच 26/11 संविधान दिनी चंद्रपूर येथे होणाऱ्या ओबीसी मोर्चा च्या अनुषंगाने जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले, रॅली मध्ये नारे तसेच गाण्याच्या माध्यमातून ओबीसी जनजागृती करण्यात आली. गावातील प्रत्येक चौकात थांबून लोकांना ओबीसी जनगणना चे महत्व पटवून सांगितले.

“गेली नव्वद वर्षे झालीत पण ओबीसी (VJ, DNT, NT, SBC) प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही. सन 1931 ला भारतात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपावेतो ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झाली नाही. आजपर्यंत ओबीसी समाजाची आकडेवारी कळली नाही. त्यामुळे ओबीसी समाज अनेक सुविधेपासून वंचित आहे. ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झालीच तर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय ठिकाणी हक्क व अधिकार मिळेल.”

मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.

कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात. संपूर्ण जिल्हाभर तसेच गावागावात ओबीसी जनजागृती रॅलीचे आयोजन सुरू आहेत. 26/11 संविधान दिन ला होणाऱ्या ओबीसी विशाल मोर्चात हजेरी लावली.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,खासदार बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार,वरोरा भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना ओबीसी समन्वय समिती चंद्रपूर जिल्हा नि निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली.
दरम्यान बळीराज धोटे यांनी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवले नसल्याचे व्यक्तव्य करून मंचावर असलेल्या खासदार व इतर लोकप्रतिनिधींना एक प्रकारे टोमणा मारला तर काही वक्त्यानी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …