Breaking News

*कुही शहरात गुरवारला 26/11 हल्यात शहीद जवानांना श्रद्धांजलि*

*कुही शहरात गुरवारला 26/11 हल्यात शहीद जवानांना श्रद्धांजलि*

कुही प्रतिनिधि – निखिल खराबे

कुही:-कुही शहरात गुरवारला 26/11 शहीद हुतात्मा दिन व संविधान दिनाचे औचित्य साधून कुही पोलिस स्टेशन येथे कुही शहर सांस्कृतिक युवा मंच व कुही शहर मित्र परिवारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टनसिंग व मास्कचा उपयोग करून कार्यक्रम घेण्यात आला. शहीद जवानांना श्रद्धांजलि देत कँडल मार्च आयोजित करण्यात आला होता . त्यानंतर आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष परघने साहेब कुही पोलिस निरीक्षक, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकिशोर भाऊ दंडारे अध्यक्ष राष्ट्रीय किसान क्लब, सौ.अर्चनाताई हरडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला, विलासभाऊ राघोर्ते अध्यक्ष कुही शहर राष्ट्रीय काँग्रेस, विनोदभाऊ हरडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, हुकुमचंद भाऊ लांबाडे, सरीनदादा शंभरकर युवा नेता, प्रशांतभाऊ दशमवार युवक कांग्रेस जिल्हा सचिव, रमेशभाऊ रेहपाडे शिवसेना नेता, दिपक लांजेवार, संकेत खतवार, प्रतिक ढबाले, समिर पठाण, अमोल झाडे, अमोल वासनिक, प्रमोद येळने, अंश गायगवरी, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …