*ब्रेकिंग न्यूज़* *धक्कादायक :-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ता डॉ. शितल आमटे यांनी रहत्या घरी विश प्राशन करून केली आत्महत्या* *वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित*

*ब्रेकिंग न्यूज़*

*धक्कादायक :-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ता डॉ. शितल आमटे यांनी रहत्या घरी विश प्राशन करून केली आत्महत्या*

*वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – अख्ख्या जगात प्रशिद्ध असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय छडयंत्र तर नाही ना ? राजकीय छडयंत्रांच्या त्या बळी तर गेल्या नाही ना ? असे प्रश्न वरोरा शहरात चर्चील्या जात आहे. शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काय गुपित आहे ? या प्रश्नाची उकल येणाऱ्या काळात तर होईलच मात्र त्यांनी मानसिक नैराशापोटी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …