*मर्चंट नेव्ही आँफीसर वेलफेअर व्दारे रक्तदान*

तालुका प्रतिनिधी – रवी काळबांडे
नागपूर ः देशात व राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असुन गरजु रुग्णांना रक्त पुरवठा करणे रक्तपेढ्यांनाही कठीण झाले आहे.सोबतच कोरोना विषाणूचे वाढते थैमान अश्यात रक्ताची उणीव अधिकच जास्त भासत असुन राज्य व केन्द्र सरकार तर्फे नागरिकांना रक्तदान करावे अशी विनंती सुद्धा करण्यात येत असल्याचे लक्षात घेऊण मर्चंट नेव्ही आँफीसर्स वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वयःफुर्तीने 18 युनिट रक्तदान करुण आपले योगदान दीले.
दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11-00 वाजता मर्चंट नेव्ही आँफीसर्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी स्वतः जीएसके ब्लड बँक रामदास पेठ नागपुर येथे पोहचुन 18 युनिट रक्तदान करुण “समाजाला आपलं ही काही देनं लागतं” याचा परिचय दीला.याप्रसंगी मर्चंट नेव्ही आँफीसर्स वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज