*सिल्लारी येथील अपघातात महिला जखमींना आर्थिक मदत मिळावी याकरिता भाजप आदिवासी आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले*

देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल
देवलापार – भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीच्या वतीने आज गुरुवारला दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटीयारे यांना आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री ज्ञानेश्वर ढोक यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन देण्यात आले.
दिनांक ३० नोव्हेंबर ला खापा या गावातील जवळपास ४८ महिला मजूर वन विभागात मजुरीवर जात असतांना तोतलाडोह मार्गावरील सिल्लारी येथील जंगलात ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ट्रॅक्टर मध्ये असलेल्या ४८ महिला कामगार यांचा अपघात झाला होता,त्या अपघातातील जखमी महिला रामटेक येथील किमया हॉस्पिटल, योगीराज हॉस्पिटलमध्ये व नागपूरच्या विविध रुग्णलयात उपचार घेत आहेत.त्या घरच्या कमवत्या असल्यामुळे त्या अपघातात जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तसेच त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असल्यामुळे त्या जखमी महिलांना आर्थिक मदत दयावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मजूर असतांना वनविभागाने सिल्लारी गेट वरून आत जाण्यास कशी परवानगी दिली असा ही प्रश्न उपस्थित होती. वन विभागाने परवानगी नाकारली असती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता असे बोलले जात आहे.
यावेळी भाजपा आदिवासी आघाडीचे नागपूर जिल्हा महामंत्री ज्ञानेश्वर ढोक,अविनाश खळतकर(जिल्हा महामंत्री भाजपा),विकास तोतडे(जिल्हा उपाध्यक्ष भाजपा),योगराज टेकाम अध्यक्ष देवलापार मंडळ आदिवासी आघाडी,मनिष टेकाम,दिलीप देशमुख, संजय मूलमुले,राजेश ठाकरे ,लक्ष्मण केने,सुंदरलाल ताकोत,सतिश डोंगरे,
राहुल किरपान,अतुल हजारे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज