Breaking News

*शेतकरी विरोधात तीन काळे कायदे रद्द करावा या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आम आदमी पार्टीच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन*

*शेतकरी विरोधात तीन काळे कायदे रद्द करावा या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आम आदमी पार्टीच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन*

अमरावती प्रतिनिधी :- राजेंद्र वाटाणे

अमरावती – दिल्ली मध्ये शेतकरी विरोधी 3 काळे कायदे केंद्र सरकारला मागे घेण्याकरिता,शेतकरी थंडीत दिल्लीच्या सीमेवर मागील 20 दिवसापासून लढत असून,सत्ताधारी शेतकरी समाजाचा अंत पाहत आहे.शेतकऱ्यांना समर्थन देण्याकरिता आज अमरावती शहरातील आम आदमी पक्षाचे वतीने आज सम्पूर्ण देशभर धरणे आणि एक दिवसाचा उपवास करून केंद्र सरकारच्या कुंभकर्णी झपेतून जागे करण्या करीता धरणे आणि उपवासाचे प्रयोजन करण्यात आले आहे.केंद्र सरकारला सदर तीन काळे कायदे करण्याची मागणी कोणत्याही शेतकरी यांनी केली नव्हती.तरी सुद्धा केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस करून शेतमालाचे बाजराभाव पाडण्यासाठी आणि गुलाम बनविण्यासाठी आग्रही आहे. आम आदमी पक्ष या तीनही काळे कायदे मागच्या दाराने मंजून करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राजकर्त्याचा निषेध करून.सदर तीन शेतकरी विरोधी कायदे मंजुरिस स्थगिती देऊन रद्द करण्याची बुद्धी किंबहुना केंद्र सरकारकडून कृती करावी अशी मागणी आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात करते.

आज अमरावती मध्ये किसान संघर्ष समिती वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन आणि उपवास करून करण्यात आली.सदर शेतकरी समर्थानात आम आदमी पक्ष,भारतीय कम्युनि.बहुजन वंचित आघाडी,वनजागरण मनाशी व क्रांतिकारी स्मरण समिती आणि बहुसंख्येने शेतकरी समर्थक उपस्थित होते.आम आदमीच्या वतीने प्रा.संजय पांडव, डॉ रोशन अर्डक वंचित चे अलीम पटेल,भाकप चे अशोक सोनालकर आणि इतर पक्ष आणि संघटनांचे पदाधीकरी व शेतकरी समर्थकांनी सहभाग लोकशाही पद्धतीने घेतला.
प्रा.संजय पांडव ,आप संयोजक अमरावती इतर नावे ची यादीचे पान पाठवीत आहो.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …