Breaking News

*आर्वी येथे नगरपालिकेच्या प्रस्तावित अभ्यासिकेवर चेतन अग्रवालणे चालवला बुल्डोजर*

*आर्वी येथे नगरपालिकेच्या प्रस्तावित अभ्यासिकेवर चेतन अग्रवालणे चालवला बुल्डोजर*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे

आर्वी- माँ दुर्गावती नगर येथील ओपन स्पेस मध्ये असलेल्या प्रस्तावित अभ्यासिकेच्या इमारतीवर चेतन अग्रवाल नामक व्यावसायिकाने सूडबुद्धीने बुल्डोजर चालवून नासधूस केली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या सप्नांवर पाणी फेरले.

दिनांक 17/12/2020 रोज गुरूवारला दुपारी कोणीही अभ्यासिकेच्या परिसरात राहत नाही याचा फायदा घेऊन पैशाचा माज आलेल्या चेतन अग्रवाल नामक व्यावसायिकाने नगरपालिकेच्या इमारतीवर अक्षरशः बुल्डोजर चालविला. यावेळी तेथील रहिवाशांनी विरोध केला पण तरीही बुल्डोजर थांबायला तयार नव्हते. सदर बाब नगरसेवक श्री.हेमंत काळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली पण तरीही बुल्डोजर थांबायला तयार नाही.शेवटी नगरसेवकांना बुल्डोजर मधील पावड्यात बसावे लागले तेव्हा कुठे बुल्डोजर थांबला. सदर घटनेमुळे येथील रहिवाशांनी चेतन अग्रवाल या पैशाचा माज आलेल्या व्यक्तीचा निषेध केला.


*गोर गरीब मुलांच्या भविष्यावर बुल्डोजर चालवणाऱ्या चेतन अग्रवाल चा जाहीर निषेध…*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …