*हिंदु धर्मा चे अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी*

*विविध संघटनांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कन्हान पोलीस स्टेशन मार्फत निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्ह्याचा काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्मा विरुद्ध सोशल मीडिया वर एक व्हिडियो वायरल केल्याने हिंदु धर्माचा अपमान केला असुन कन्हान शहर येथे विविध संघटनांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कन्हान पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत हिंदु धर्मा चे अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
*भाजपा पारशिवनी तालुका*
कन्हान शहर येथे भाजपा पारशिवनी तालुकाच्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचा नेतृत्वात व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांचा उपस्थिति मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन हिंदु धर्माचा अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
निवेदनात सांगितले कि शुक्रवार दिनांक १८ डिंसेबरला दुपारच्या सुमारास अरबाज खान या ईसमाने हिंदु महिलांना शिविगाळ करीत व धमकी देत असलेला एक व्हिडियो सोशल मीडिया वर वायरल केला असुन हिंदु धर्माचा अपमान केल्याने भाजपा पारशिवनी तालुकाच्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचा नेतृत्वात व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांचा उपस्थिति मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन हिंदु धर्म महिलांचा अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
निवेदन देते वेळी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , महामंत्री संजय रंगारी , अमिष रुंघे , तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनिल लाडेकर , अमोल साकोरे , नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , अजय लोंढे , मनोज कुरडकर , भाजपा कांन्द्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले , रिंकेश चवरे , रुषभ बावनकर , सुषमा मस्के , शालिनी बर्वे , लिलाधर बर्वे , लोकेश अंबाडकर , शैलेश यादव , देवेंन्द्र सिंग , भगवान सावरकर , महादेव वंजारी , रोशन यादव , मारोतराव लसुंते सह अनेक भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते .
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कन्हान पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत हिंदु धर्मा चे अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली . निवेदनात सांगितले कि नागपुर जिल्ह्याचा काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्माचा विरुद्ध एक व्हिडियो बनवुन सोशल मीडिया वर शेअर करुन हिंदु धर्माचा अपमान केला असुन अरबाज खान या ईसमाने व्हिडियो मध्ये हिंदु धर्माचा महिलांना शिविगाळ केल्याने हिंदु धर्माचा लोकांचा आत्मसंन्मानाला ठेस पोहोचविण्याचे कार्य केले असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कन्हान पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत हिंदु धर्मा चे अपमान करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
निवेदनात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सोनु खोब्रागडे , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , अमित भारद्वाज , मुकेश गंगराज सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज