Breaking News

*जय दुर्गा भजन मंडळ च्या वतीने निराधार जेष्ट चिंधुजी चापले यांची चौदवी साजरी*

*जय दुर्गा भजन मंडळ च्या वतीने निराधार जेष्ट चिंधुजी चापले यांची चौदवी साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक

कन्हान : – जेष्ठ निराधार चिंधुजी चापले हे कसेतरी जिवन जगत असतांना प्रकृती खराब झाल्यामुळे उपचारा दरम्यान शासकिय रूग्णालय नागपुर येथे त्यांचा मुत्यु झाला. त्याचे कुणीही नातेवाईक नसल्याने कन्हान पोलीसांनी त्यांचा अंतिम संस्कार कन्हान नदी शांती घाटावर केला. संताजी नगर कांद्री येथील जय दुर्गा भजन मंडळा च्या वतीने भजनाच्या कार्यक्रम व अल्पोहारा वितरण करुन निराधार जेष्ट चिंधुजी चापले यांचा चौदवीचा कार्यक्रम साजरा केला.
जय दुर्गा मंदीर संताजी नगर कांद्री परिसरात खुप वर्षा पासुन जेष्ठ नागरिक चिंधुजी चांगोजी चापले वय ८५ वर्ष हे भिक्षा मागुन कसेतरी आपले जिवन जगत असताना दि.१ डिसेंबर ला त्याची प्रकृती खराब झाल्यामुळे तेथील नागरिकांनी , कांन्द्री ग्रामपंचायत सदस्य सौ अरूणा हजारे, मनोज वडे यांनी मदती चे हात समोर केल्याणे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला उपचारा करिता नेले असता प्रकृती जास्त असल्याने शासकीय रूग्णालय नागपुर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान (दि.२) डिसेंबर ला त्यांचा मुत्यु झाला. त्यांचे नातेवाईक नसल्याने कन्हान पोलीसांनी त्यांचा अंतिम संस्कार कन्हान नदी शांती घाटावर केला. दुर्गा मंदीर संताजी नगर कांद्री परिसरात ते राहत असल्याने येथील जय दुर्गा भजन मंडळ च्या वतीने दिनांक १५ ला दुर्गा मंदीर येथे भजनाचा कार्यक्रम करून उपस्थितांना अल्पोहार वितरण करुन जेष्ठ नागरिक चिंधुजी चापले यांचा चौदवी कार्यक्रम साजरा करण्यात आला. परिसरातील गजानन वडे, कवडु नामदेव बारई, भगवान लांजेवार, चिंधुजी पुंडेकर, शेषराव आखरे, पुसाराम कामडे, विठ्ठ ल पुंड, कवडु ढाले, दिनबाजी ठाकरे, कवडु आखरे, पुष्पाबाई झोडावणे, विमलबाई बोरकर, येणुबाई वाघाडे, रायवंताबाई भोंडे, सुगंधाबाई बारई, वदंनाबाई मेश्राम, चंद्रकलाबाई सारवे, शोभाबाई बावणे आदि जय दुर्गा भजन मंडळां च्या सदस्यां नी सहकार्य केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …