Breaking News

*३९ हजार मतदार ठरविणार ११२ ‘गावपुढारी’* *१५ जानेवारीला १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका* *केबीनेट मंत्री केदार यांची प्रतिष्ठा पणाला* *अन्य राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनी कसली कंबर* *बुधवार पासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात* *पहिल्या दोन दिवसात एकही नामांकन नाही*

*३९ हजार मतदार ठरविणार ११२ ‘गावपुढारी’*

*१५ जानेवारीला १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका*


*केबीनेट मंत्री केदार यांची प्रतिष्ठा पणाला*

*अन्य राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनी कसली कंबर*


*बुधवार पासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात*

*पहिल्या दोन दिवसात एकही नामांकन नाही*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः राज्य निवडणूक आयोगाने नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला सावनेर तालुक्यात एकूण १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून राजकीय नेत्यांसह राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे १२ ग्रामपंचायत अंतर्गत येणारे एकूण ३९ हजार ५०७ मतदार ११२ ग्रामपंचायत सदस्यांचे भाग्य ठरविणार आहेत बुधवार २३ डिसेंबर पासून तालुका कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात झाली आहे सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या मतदार संघात होत असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


नैसर्गिक आपत्ती व कोरोना महामारीमूळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या मात्र कोरोनाचे सावट सुरू असतांनाही डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम १२ डिसेंबरला जाहिर करण्यात आला सावनेर तालुक्यात गङमी, जैतपूर, जटामखोरा, नरसाळा, पोटा, पाटणसावंगी, खुबाळा, खुर्सापार, टेंभुरडोह, सावंगी हेटी, सोनपुर, नांदोरी या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत आहे २३ ते ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरने, ३१ डिसेंबर नामनिर्देशन पत्राची छाननी, ४ जानेवारी २०२१ नामनिर्देशन पत्र मागे घेणे, १५ जानेवारी मतदान व १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत सावनेर तालुक्यात होणाऱ्या एकूण १२ ग्रामपंचायत अंतर्गत ३९ हजार ५०७ असून अनु जाती ७८५१ तर अनु जमाती मधील ५३०८ मतदार आहेत १२ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ग्रामपंचायत निहाय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे कांग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, भारिप, राष्ट्रवादी कांग्रेस, बीएसपी आदि पक्षात प्रमुख लढत आहे होत असलेल्या अधिकतर ग्रामपंचायतवर केदार गटाची सत्ता आहे मात्र सत्ता टिकवून ठेवणे आव्हाण आहे १२ ग्रामपंचायत पैकी पोटा व पाटणसावंगी ग्रामपंचायत मोठया आहेत पाटणसावंगी ग्रामपंचायत येथे ११ हजार ३९८ तर पोटा ग्रामपंचायत येथे १३ हजार ८५१ मतदार आहेत पाटणसावंगी गाव सुनील केदार यांचे गृहगाव आहे कोरोना काळातील तालुक्यात प्रथम निवडणूक आहे त्यामूळे एकमेकांना धूळ चारण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर करीत आहेत जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत “कौन जितेगा” येणारी वेळच सांगणार आहे.

तर नामनिर्देशनाच्या पहल्या दोन दिवसात एकाही उम्मेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नसल्याची माहीती नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी दिली असुन तालुक्यातील सदर ग्रामपंचायत निवडनुकीची संपूर्ण तयारी व होऊ घातलेल्या निवडणूका शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दिपक कारंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …