*डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण*

*डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपुर जिल्हा तर्फे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपुर जिल्हा तर्फे शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२२ व्या जयंती निमित्त डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.
नागपुर विभागीय शिक्षक संम्पर्क कार्यालय वाठोडा येथे मा विलास भालेकर अध्यक्ष विदर्भ आटो रिक्षा चालक फाऊंन्डरेशन, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपुर यांचे हस्ते व मा शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष डॉ पं दे रा शि परिषद यांचे अध्यक्षेत आणि मा विनोद मेंढे सचिव उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ नागभिड, सौ सरिताताई चकोले नगरसेविका मनपा, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, विभागिय प्रवक्त्या प्रा कीर्ती काळमेघ, मोतीराम रहाटे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण पत्रकार यांचा प्रमुख उपस्थितित शिक्षणमहर्षी दिनदर्शिका २०२१ चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात डॉ पं दे शि परिषदेचे पदाधिकारी नंदलाल यादव, योगेश कडु , गुणवंत देवाडे, संजीव शिंदे, राजेश मालापुरे, विजय कांबळे, चेतन चव्हाण, सुरज बमनोटे, समीर शेख, मेघराज गवखरे, प्रविण मेश्राम, गजानन कोंगरे, हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, नंदा वाळके, पुष्पा कोंडलवार, प्रिया इंगळे, विनोद चिकटे, लोकोत्तम बुटले, पक्षभान ढोक, मारोती देशमुख, समीर पिल्लेवान मुख्याध्यापक, सह अनेक नागरिक उपस्थित असून कार्यक्रमाचे सुत्र संचालन मेघराज गवखरे यांनी केले तर नंदा वाळके यांनी आभार मानले. या सोहळयास पदाधिकारी व शिक्षक बंधु भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज