*गावकऱ्यांना दर्शनाचा प्रशासनाचा मज्जाव*

*गावकर्यांत नाराजीचा सुर*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मसके
नरखेड – तालुक्यातील बेलोना येथील बन्धिस्त हनुमानाची दत्त पोर्णिमेच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रे दरम्यान दर्शनासाठी आलेले गावकरी पोलिसांच्या उपस्थितीने नाराजी व्यक्त करत असुन त्यांना आपल्या ग्रामदैवत बन्धिस्त हनुमंताचे यावेळी दर्शन घेता आल्या नसल्याने रोष निर्माण होत आहे.
आज नुकतीच चालू झालेलं बजरंगबलीची (हनुमंताती) रथ यात्रा ही वर्षातून फक्त तीन दिवस दर्शनासाठी पाहाल मिळते आणि वर्षभर बन्धिस्त या हनुमंताच्या दर्शनासाठी गावकरी जनता सोशल डिस्टांस आणि मास्क लाऊन दर्शनासाठी येत असल्यामुळे त्यांना दर्शन करता येत नसल्यामुळे गावात वातावरण तापले जात आहे.

एकीकडे कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता गावकऱ्यांनी प्रशासनानी दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करत आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन गावकऱ्यांनी मंदिर परिसरातून हुडकून लावत असल्याची सद्यास्थिती बेलोना येथिल रथ यात्रे दरम्यान निर्माण झाली आहे.
गावकरी नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की आम्ही कोरोना दिशानिर्देशाचे पालक करु फक्त आम्हाला आमचे ग्रामदैवत बन्धिस्त हनुमानाचे एक नजर दर्शन करु द्या.

एकीकडे केन्द्र व राज्य शासनाने देशातील सर्व मंदिरे उघडून भावीकांना दर्शनासाठी उपलब्ध करुण दिले असुन इत धर्माचा धर्माक आयोजन नियोजन पुर्वीप्रमाणेच सुरु असुन बेलोना रथ यात्रे दरम्यान बाहेरून येणार्या भाविकांवर आधिच बंदी घातली आहे मग गावातील मोजक्या भाविकांना दर्शन घेऊ देण्यासाठी अडचन काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.बेलोना ग्रामवासी नागरिकांच्या विनंतीला स्थानिक व पोलीस प्रशासनाने मान्यता देऊन दर्शन करु दिले पाहजे याकरिता क्षेत्रातील सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य तसेच वरिष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज