Breaking News

*गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मंत्री ना. छगन जी भुजबळ यांना निवेदन* *गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीची एकरी मर्यादा 20 क्विंटल करण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घेतली भेट* *शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आमदार डॉ देवरावजी होळी मंत्राच्या दारी*

*गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मंत्री ना. छगन जी भुजबळ यांना निवेदन*

*गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीची एकरी मर्यादा 20 क्विंटल करण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घेतली भेट*

*शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आमदार डॉ देवरावजी होळी मंत्राच्या दारी*

 

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गढ़चिरोली –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करताना खरेदीची मर्यादा केवळ ९.६ क्विंटल करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून खरेदी मर्यादा एकरी 20 क्विंटल करण्यासह, अतिक्रमित व वनहक्क धारक शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना निवेदन देऊन केली.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्या घेऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठे आंदोलन करण्यात आले. खरेदी मर्यादा वाढविण्यासह अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना व वनहक्क धारक शेतकऱ्यांना केंद्रावर धान खरेदी सह महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आमदारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले त्याच मागण्याच्या पूर्ततेसाठी आपण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यां वरील अन्याय दूर करावा अशी विनंती केली असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे.. त्याचबरोबर शासनाच्या मार्फत धान विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या अत्यंत किचकट असणाऱ्या खरेदी प्रक्रियेला सुलभ करून शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास थांबविण्यात यावा अशीही मागणी यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …