Breaking News

*पतसंस्थेच्या अभिकर्त्याने केली १८लाखाची अफरातफर.*

*पतसंस्थेच्या अभिकर्त्याने केली १८लाखाची अफरातफर.*


*कुहीतील संत जगनाडे पतसंस्थेतील प्रकार.**

*ग्राहकांच्या पैशांवर मारला डल्ला.*

*अभिकर्ता राजू इटनकर अद्यापही फरार…*

प्रतिनिधि–प्रदिप घुमडवार (कुही)

 कुही- *स्थानीय संत जगनाडे महाराज पतसंस्था मर्यादित कुही येथील एका पिग्मी अभिकर्त्याने ग्राहकांची दररोज येणारी रक्कम पतसंस्थेत ग्राहकांच्या खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेऊन १८लाख ९ हजार ४००रुपयांची अफरातफर केल्याचे उघड झाले आहे.हे प्रकरण मागील दोन वर्षापूर्वीचे असले तरी कुही पोलीस स्टेशनला मात्र २० दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला.*
  *यातील आरोपी अभिकर्ता राजू इटनकर (रा.कुही) असे असून तो आता फरार आहे.राजू हा सन२००८ पासून कुही शहरातील श्री संत जगनाडे महाराज पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून काम करायचा. तो दररोज त्यांनी बचत करणाऱ्या खातेदारांकडून पैसे गोळा करायचा व दुसरे दिवशी ती विशिष्ट रक्कम प्रत्येक खातेदारांच्या खात्यात व पासबुकात त्याची रीतसर नोंद करायचा.दरम्यान त्याने कवडू चौधरी या खातेदारांच्या पैसे काढण्याच्या स्लीपवर खोट्या व बनावटी स्वाक्षऱ्या करून कर्जाची उचल केली होती.मात्र त्याने कर्जाची रक्कम खातेदारास न देता स्वतःकडे ठेऊन घेतली.*
  *राजुने या पद्धतीने एकूण २४ लाख४० हजार २२० रुपयांची उचल करून त्यातील १२ लाख५६हजार ६१० रुपये  खात्यात जमा केले.आणि उर्वरित ११लाख ८३ हजार ६१० रुपये स्वतःच्या कामासाठी वापरले.हा प्रकार लक्षात येताच चौधरी यांनी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली.चौकशीअंती राजुने या पद्धतीने इतरांकडून रकमेची उचल करीत त्यांनी एकूण १८ लाख९ हजार ४००रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.याप्रकरणी कवडू चौधरी यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी राजू विरुद्ध भादवि ४०६,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे..वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्यास पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.*
*दोन वर्षापूर्वीचे या

*दोन वर्षापूर्वीचे या प्रकरणात आता २०दिवसापूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला आहे असे कुहीचे पोलीस निरीक्षक परघणे यांनी सांगितले.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के करीत आहे.*

आता २०दिवसापूर्वी गुन्हा नोंद करण्याआला आहे असे कुहीचे पोलीस निरीक्षक परघणे यांनी सांगितले.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सनटक्के करीत आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …