Breaking News

*सावनेर शहरात प्रथमच कु्त्रीम जलकुंडाचा यशस्वी प्रयोग*

*सावनेर शहरात प्रथमच कु्त्रीम जलकुंडाचा यशस्वी प्रयोग*

*शहरातील नागरिकांत उत्साह*

प्रतिनिधि- सुरज सेलकर (सावनेर)
*सावनेरशहरात गणेश विसर्जन दरम्यान कु्त्रीम जलकुंडाचा प्रयोग नगर प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आला*
*नदी तलावाचे पर्यावराणा पासुन संरक्षण व्हावे याकरिता मोठ्या शहरात नदी तलावा काठी कु्त्रीम जलकुंड कयार करुण त्यात गणरायाचे विसर्जन करण्यात येते त्याच प्रमाणे सावनेर शहरात ही नगर प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारानी ही योजना सफल झाली.*
*दहा दिवस आपल्या घरी बाप्पाला विराजमान करुण त्याची पुजा अर्चना करुण आपल्या आराध्याचे विसर्जन यापूर्वी कोलार नदिच्या मुरलीधर मंदीर व शिव मंदीराच्या तीरावर चिखल माती व साचलेल्या घाण पाण्यात करण्यास भाविकांना भाग पडायचे व खिन्न मनानी आपल्या आराद्यास नीरोप देत होते परंतू नगर प्रशासन, मुख्याधिकारी व नगरीतील समाजसेवींच्या पुढाकाराने यावेळी नदीच्या काठावर कु्त्रीम जलकुंड उभारणी करून त्यात गणेशाचे विसर्जन करुण आपण आपल्या गणरायाचे स्वच्छ पाण्यात विसर्जन करुण पर्यावरण राखन्यात सुध्दा मदत केल्याचा आनंद भाविकांच्या चेर्यावर स्पष्ट पणे दीसत होता.*
*विसर्जन स्थळावर सावनेर पोलीसांचा बंदोबस्त तसेच नगर प्रशासनाने आपले कर्मचारी व समाजसेवी कार्यकर्ते उपस्थित ठेवल्यामुळे कोणताही अनुचीत रकार न घडता उत्साहात गणेश विसर्जन आटोपले शहरातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल नगर परिषद चे मुख्याधिकारी तसेच पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी आभार मानले.तर नागपूर जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सावनेर सह जिल्ह्यात अधिकांश पो.स्टे अंतर्गत विसर्जन स्थळाला भेट देऊण पोलीस अधिकारी,कर्मचारी व समाजसेवींचा उत्साह वाढविला हे विशेष.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …