Breaking News

*प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम* *प्राथमिक स्तरावर आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन -(उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे)*

*प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम*

*प्राथमिक स्तरावर आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन –(उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे)*

मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर

सावनेरः कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केन्द्र सरकार व राज्य शासनाने कोवीड़ 19 लसिकरण मोहिमेकरिता सज्ज झाले असुन देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारी पासुन सुरुवात होत असुन सदर लसीकरणाची प्राथमिक रंगीत तालीमेची सुरुवात प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉ. साजीद खान,सावनेर नगर पालीकेचे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे,सावनेर प्रा.आ.के.सावनेर चे कोवीड़19 नियंत्रण अधिकारी डॉ संदिप गुजर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ आदिंच्या प्रमुख उपस्थितीत रंगीत तालीम घेऊण 19 आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले*

याप्रसंगी देशभरात कोवीड़ 19 लसीकरण बाबत पसरलेला गैरप्रकार व बीन बुडाचे आरोप प्रत्यारोप या केवळ पोकळ चर्चा असल्याची जनजागृती करणे तसेच अफवांवर विश्वास नकरता लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या हेतूने संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असल्याचा विश्वास व त्या अनुशंगाने पुढील तयारीच्या वरिष्ठांन कडून प्राप्त सुचना व आढावा याप्रसंगी घेण्यात आला.

कोवीड़19 लसीकरण मोहिमेचे हे पहिले चरण असुन संपूर्ण जिल्ह्यातील 13 आरोग्य केन्द्रावरुन सुटीचे दिवस वगळता दररोज 100 आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आरोग्य सेवक,आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग व पन्नास वर्षावरील संशयीतांना आँनलाईन पध्दतीने लसीकरण करण्यात येणार असुन पुढील चरणाची सुरुवात केन्द्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशावरुण करण्यात येण्याची माहीती सावनेर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

तर जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉ. साजीद खान यांनी ही सदर लसीकरण बाबतची जिल्हा आरोग्य विभागाची तयारी व त्याचे टप्पे यावर सविस्तर माहिती दिली व सावनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांनी सदर लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली सोबतच प्रथम चरणात कोवीड़ योध्दा म्हणून कार्यरत स्थानिक पत्रकारांनाही पुढील चरणात समाविष्ट करुण घेण्याकरिता पाठपुरावा करण्याची हमी दीली.

याप्रसंगी जिल्हा स्तरिय पर्यवेक्षक स्नेहल मेन्ढे,डॉ. संदीप गुजर,(नोडल वैद्यकीय अधिकारी) डॉ. प्रितम निचट,तालुका सहा.आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने,डॉ. हरिष बरैय्या,डॉ. ईसरत,डॉ. शुभ्रा,श्रीमती ऐटे,प्रामुख्याने उपस्थित होते.


तर सदर कोवीड़ 19 लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालीमेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी गुणवंत ठाकरे,प्रणय कोरडे,घनश्याम तुर्के,प्रकाश धोटे,योगीता लांजेवार, मंजुषा भगतवार,प्रतिभा लांजेवार आदिंनी लसीकरण कश्या पध्दतीने पार पाडले जाणार याचे प्रात्यक्षिकाची माहीती दिली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …