Breaking News

*शेत पीकांच्या संरक्षणासाठी अगळावेगळा प्रयोग* *शेतीला घातलयं चक्क साड्यांचे कुंपण*

*शेत पीकांच्या संरक्षणासाठी अगळावेगळा प्रयोग*

*शेतीला घातलयं चक्क साड्यांचे कुंपण*

मुख्य संपादक – किशोर ढुंढेले

सावनेरः देशाचा ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा समझल्या जाणाऱ्या व सर्वच कटू प्रसंगाला तोंड देत आपल्या पीकांचे संरक्षण करणारा शेतकरी बांधवांनी आपल्या पीकाचे वन्यप्राण्यांपासुन बचाव करण्याकरिता ना ना प्रकारच्या उपाययोजना करतात असाच एक प्रकार म्हणजे शेताला साड्यांचे कुंपण.

देशातील शेतकर्यांच्या हालअपेष्टा कुणापासुच लपलेल्या नाही उन,वारा पाऊस,ओला सुका दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट,नापीकी तसेच हवामानाचा बदल अश्या सर्वच सोबतच आस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत आपल्या पीकाचे संरक्षण करतो तेव्हाच आपल्या ताटात रुचकर अन्न पोहचते.आपल्या ताटातील एका अन्नाचा दाणा पीकविन्याकरीता जवळपास सहा महिने जीवाचे राऩ करत घाम गाळावा लागतो अश्यातच जंगल शेजारी असलेल्या शेतात राऩ डुकरे, रोही,निळगायी आदिंसह अन्य वन्यप्राण्यांच्या शीरकाव शेतात होतो आणी हे वन्यप्राणी अख्या पीकाची नासोडी करुण टाकतात.आपल्या पीकांचे नुकसानी करणाऱ्या वन्यप्राण्यांना मारन्याची परवानगी नसल्याने हतबल झालेला शेतकरी आपल्या पीकाचे संरक्षणासाठी शेतीला काटेरी कुंपण, तारांचे कुंपण त्यात विद्युत प्रवाह सोडून संरक्षण करतो परंतू तो दोन्हीही बाजूने घातकच ठरतो विजेच्या संपर्कात येऊण वन्यप्राण्यांचा जीव गेला तर गुन्हा दाखल अथवा चुकीने एखाद्याचा हात लागली की जीव हानी यावर उपाययोजना म्हणून अनेक शेतकरी बांधवांनी थोडा महागडा परंतू सुरक्षित प्रयोग करत शेताच्या संपूर्ण बांध्यावर चक्क साड्यांचे कुंपण करुण आपल्या पीकांचे संरक्षण करण्याची नवीन शक्कल लढवली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …