Breaking News

*श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान सावनेर नगर व तालुका कार्यालय उद्घाटित*

*श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान सावनेर नगर व तालुका कार्यालय उद्घाटित*

 

विशेष प्रतिनिधि- सावनेर

सावनेर – श्री राम धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत, भारताचा आत्मा आहे. श्री राम जन्मभूमीवर भव्य असे श्री राम मन्दिर असावे हि प्रत्येक भारतीय जनमाणसाची इच्छा आहे. हे केवळ मंदिर निर्माण नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात श्री राम आणि त्यांच्या जीवन मूल्यांची प्रतिष्ठा व्हावी, समाजातील प्रत्येक वर्गात परस्पर प्रेम, सदभाव,बंधुत्व दृढ व्हावे आणि ज्या प्रमाणे सेतुबंध समयी छोट्याश्या खारीचा वाटाही महत्त्वपुर्ण होता त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयांचे यथाशक्ती योगदान या पावन कार्यात राहावे या साठी “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ” न्यास द्वारे देशव्यापी श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान राबविल्या जात आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. जयंतराव मुलमुले यांनी या अभियानाच्या सावनेर नगर व तालुका कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

दि. १२/०१/२०२१ मंगळवार रोजी पोटोडे कॉम्प्लेक्स गांधी चौक सावनेर येथे नगराध्यक्षा सौ. रेखाताई मोवाडे, सौ पल्लवी ताई मुलमुले माजी नगराध्यक्षा , आचार्य श्री प्रशांतजी महाराज , नगरसेवक तुषारजी उमाटे , डॉ. मोनाली पोटोडे, डॉ विजयजी धोटे, सौ सविता आठवले आणि श्री आशुतोषजी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
या प्रसंगी नगर निधी संकलन समितीचे श्री राम आवदे, अभिषेकसिंह गहरवार, डॉ नितीन पोटोडे, मंदार मंगळे, लक्ष्मीकांत पोटोडे , नरेंद्र ठाकूर, ऍड चंद्रकांत पिसे, प्रा. श्री निमिषे, आनंद श्रीवास्तव, तेजस कुबिटकर, अरुण चाफले, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सहसंयोजक श्री कुलभूषण नवधींगे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यालय प्रमुख ऍड मनोज खंगारे यांनी केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …