*ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधक भुईसपाट*
*राज्याचे मंत्री सुनील केदारांवर मतदात्यांनी दर्शवली पुर्ण विश्वास*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत दिनेश चौरसिया
सावनेर – तालुक्यातील गडमी,खुबाळा, जैतपुर, खुर्सापार,नांदोरी,नरसाळा, पाटनसावंगी, पोटा,सोनपुर, टेभुरडोह, सावंगी हेटी या ग्रामपंचायती करीता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली त्या एकुण बरा ग्रामपंचायती पैकी जटामखोरा-रायबास निर्वीरोध तर अकरा पैकी अकरा ग्रामपंचायतीत राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार समर्थक काँग्रेस पक्षाचे उम्मेदवार निवडून आले.
याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा तसेच जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायत निवडणुकीवर नागपुर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की हा विजय आ.सुनीलबाबू केदार यांच्यावरील ग्रामीण जनतेच्या विश्वासाचा व प्रेमाचा विजय आहे,भारतीय जनता पक्षाचे राज्यातील मागील पाच वर्ष व सध्यास्थितीत असलेल्या शासनानी एक वर्षात केलेल्या विकास कामांचा विजय आहे,हा विजय गोरगरिब शेतकरी,शेतमजूर व जनसामान्यांचा विजय आहे असे मत प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
*विजयी उमेदवारांचे समर्थकांनी पुष्पहार घालून स्वागत करत गुलालाची उधळन करत एकच जल्लोष करत होते तर पराभूत उम्मेदवार व त्यांच्या समर्थकांनमधे निराशेच भाव स्पष्टपणे दिसत होता*
*तालुक्यातील संपूर्ण बारा ग्रामपंचायत निवडणुकी यशस्वीपणे पार पडण्याकरीता उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,प्रभारी तहसीलदार चैताली दराडे,निवडणूक अधिकारी पवार आदींनी मोलाची भुमिका पार पाडली*
Maharashtra News Media सच की आवाज