*पुर्व कोवीड़ विषाणू बाधित रुग्णांकरिता मोफत तपासणी*

*इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेरचा उपक्रम*

*145 पुर्व कोरोना बाधितांचा उत्सफुर्त सहभाग*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले
सावनेरः संपूर्ण विश्वात कोवीड़19 विषाणूंनी थैमान माजवून अनेकांना कोरोना विषाणूंच्या संपर्कात आल्याने या जिवघेण्या आजाराची लागन झाली व अजुनही होत आहे.याकरिता शासकीय व निमशासकीय स्तरावर सर्व आरोग्यव्यवस्था सजग असुन या विषाणू बाधितांना आपल्या सेवा पुरवत आहेत*
*अश्यात ज्यांना कोरोनाची लागन होऊण त्यांनी त्यावर मात केली अश्या तालुक्यातीलच नव्हे तर सर्व पुर्वी कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्य तपासणी करिता इंडियन मेडिकल असोसिएशन व आदित्य कोवीड़ हाँस्पिटल,आस्था पँथाँलाजी लेबोररेटरी च्या सयुक्तिक विद्देमानाने दि.15 जानेवारी रोजी मोफत तपासणी शिबीराचे आयोजोन करुन 145 पुर्वी कोरोना लागन होऊण स्वस्थ झालेल्यांची क्ष-किरण (एक्सरे),रक्तशर्करा (मधुमेह),एँन्टिबाँडी,ईसीजी आदिंच्या मोफत तपासणी करुण डॉ. शिवम् पुण्यानी एमबीबीएस एमडी (छातीरोग तज्ञ),डॉ. अमित बाहेती एमबीबीएस एमडी (मेडीसीन) सह इतर अनुभवी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले*
*सदर शिबिरात 112 रुग्णांची एँन्टिबाँडी टेस्ट केली असुन त्यातील ज्यांच्या शरिरात एँन्टिबाँडी वाढल्या असतील ते स्वेच्छेने आपला प्लाझ्मा डोनेट (दान) करुण कोरोना बाधितांचा जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात अशी माहीती डॉ शिवम् पुण्यानी ने दीली*
*शिबीराची सुरुवात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे,सचिव डॉ. परेश झोपे,नगरसेवक निलेश पटे,दिपक बसवार, माजी नगरसेवक लक्ष्मिकांत दिवटे,डॉ. संगीता जैन,डॉ. प्रविण चव्हाण आदिंच्या उपस्थितीत करण्यात आली असुन दि.17 जानेवारी रोजी “प्लाझ्मा डोनेशन” कँम्पचे आयोजन केले असल्याची माहिती याप्रसंगी बोलताना आयमए चे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे यांनी दिली*
*कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ. अमित बाहेती यांनी तर आभार डॉ. शिवम पुण्यानी ने मानले.शिबीराच्या यशस्वीतेकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य गण व शहरातील सर्व चिकित्सकांनी परिश्रम घेतले*
Maharashtra News Media सच की आवाज