Breaking News

*मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते बोरुजवाडा उडान पुलाचे लोकार्पण व भुमीपूजन सोहळा*

*मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते बोरुजवाडा उडान पुलाचे लोकार्पण व भुमीपूजन सोहळा*

मुख्य संपादक- किशोर ढुंढेले (सावनेर )

*भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक आणी महामार्ग व्दारा सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरी या राज्य माहमार्गाचे 29 कीमी चे 723-62 कोटी रुपये खर्चांचे चौपदरीकरण,कळमेश्वर -तोंडाखैरी-सिल्लोरी मार्गाचे रुंदीकरण लांबी 10 कीमी.कींम्मत 20कोटी,दहेगाव रेल्वे क्राँसिंग-मटन मार्केट कळमेश्वर ब्राम्हणी जिनींग-घोराड राज्य महामार्ग547ई मार्गाचे चौपदरीकरण लांबी 2 कीमी.किम्मत 15 कोटी,साहूली -सेलु-गुमथळा-उप्परवाही-घोगली-घोराड-धापेवाडा मार्गाचे रुंदीकरण लांबी 27 कीमि.कींम्मत 15 कोटी ईत्यादी बाधकामाचे भुमिपुजन दि.16सप्टेंबर2019 रोज सोमवार ला दुपारी 3-00वाजता मा.नितीन गडकरी केन्द्रिय मंत्री,रस्ते वाहतूक, महामार्ग,सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते,मा.चंद्रशेखर बावणकुळे मंत्री,उर्जा व नविनिकरण उर्जा,उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेत मा.विकास महात्मे खासदार राज्यसभा,कु्पाल तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र,मा.नागो गाणार आमदार, आमदार अनिल सोले,आमदार गिरीष व्यास,आमदार जोगेन्द्र कवाडे,आमदार प्रकाश गजभिये,विधान परिषद महाराष्ट्र,सुनील केदार आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र,आमदार समीर मेघे हिंगणा,आमदार सुधिर पारवे उमरेड,आमदार मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक,श्रीमती स्मृतीताई ईखार नगराध्याक्षा कळमेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार चौक कळमेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे*
*सदर आयोजनात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहवे असे निवेदन सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे विस्तारक रामराव मोवाडे यांनी केले आहे.*
*बोरुजवाड उड्डान पुलाचे लोकार्पण सोहळा*
*तत्पुर्वी सावनेर नागपूर महामार्गावरील बोरूजवाडा येथील उड्डान पुलाचा लोकार्पण सोहळा दुपारी 2-00 वाजता मा.नितीन गडकरी केन्द्रिय मंत्री,रस्ते वाहतूक, महामार्ग,सुक्ष्म,लघु व मध्यम उद्दोग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते उपरोक्त सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सदर आयोजनास सावनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे निवेदन रेखाताई मोवाडे नगराध्यक्षा नगर पालीका सावनेर व रविंन्द्र ठाकुर शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी केले आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …