Breaking News

*कामठी तालुक्यात सहा ग्रामपंचायत वर भाजपा चा झेंडा , तर दोन जागेवर काँग्रेस*

*कामठी तालुक्यात सहा ग्रामपंचायत वर भाजपा चा झेंडा , तर दोन जागेवर काँग्रेस*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी तालुक्यात ९ ग्रामपंचायत मध्ये शुक्रवार दिनांक १५ जानेवारी ला निवडणुक झाले असुन सोमवार दिनांक १८ जानेवारी ला कामठी तहसील मध्ये मतमोजणी झाली असता ९ ग्रामपंचायत पैकी ६ ग्रमपंचायत वर भाजपाने बाजी मारली , तर काॅंग्रेस दोन जागेवर थांबली . महालगाव येथे मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे .


कामठी तालुक्यात भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीला ५७ जागां वर यश प्राप्त झाले असुन काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी चे २६ सदस्य विजय , व ३ जागेवर अपक्ष सदस्य विजयी झाल्याचे चित्र दिसुन येत आहे .
कोराडी हे महाराष्ट्राचे माजी मंत्री व प्रदेश भाजप महासचिव चंद्रशेखरजी बावनकुळे यांच मुळ गाव असुन भाजपा समर्थित गटाने पाचव्यांदा या ग्रामपंचायती वर विजय प्राप्त करुन १२ सदस्य निवडुन आणले असुन पांच जागेवर काॅंग्रेस ने बाजी मारल्याचे दिसुन येत आहे .

नागपूर जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांचे निवासस्थान असलेल्या महालगाव आसोली गट ग्रामपंचायत मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असुन त्यांच्या भाजप समर्पित आदर्श ग्राम विकास आघाडीला केवळ ३ जागा मिळाल्या असून काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी ने ४ जागेवर विजय प्राप्त केला तर ३ अपक्ष सदस्य निवडून आल्याने येथे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असली तरी महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अनिल निधान यांचा गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसुन येत आहे .

कामठी तालुक्यात ९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून दिसुन येत आहे कि भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास आघाडी ला कोराडी, लोंखैरी, पवणगाव, घोरपड, भमेवाडा, खेडी अश्या ६ ग्रामपंचायती वर यश प्राप्त झाले असुन एक हाती सत्ता विजय मिळाला तर दुसरीकडे काँग्रेस समर्थित महाविकास आघाडीला केसोरी, टेमसना अश्या २ ग्रामपंचायती वर निर्विवाद एक हाती सत्ता मिळाली असून महालगाव ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून भाजप समर्थीत ग्राम विकास आघाडीला कामठी तालुक्यात ५७ जागा मिळाल्या असून काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी ला २६ जागा मिळाल्या तर ३ जागेवर अपक्ष सदस्य निवडून आल्याचे चित्र दिसुन येत आहे .कामठी तालुक्यात जनतेने भाजप समर्थीत गटाला सरशी दिल्याचे दिसून येत आहे नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोराडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री व प्रदेश भाजप महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदर्श ग्राम विकास आघाडी गटाला १७ पैकी १२ जगा निर्विवाद पणे एक हाती सत्ता मिळाल्याने पाचव्यांदा भाजप गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळाले कोराडी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मधून जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस चे ज्ञानेश्वर कभाले यांचे बंधू राजेश पन्नालाल कभाले याचा भाजप समर्थीत गटाचे उमेश निमोणे यांनी १६९ मतांनी पराभव केला निमोणे यांना ६६० मते मिळाली सोबतच लोंखैरी ग्रामपंचायत च्या ९ नव जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास आघाडीला ६ जागा निर्विवाद पणे स्पष्ट बहुमत मिळाले असून एक हाती सत्ता आली तर याच ग्रामपंचायत मध्ये नुकतेच मध्ये भाजप प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असलेले माजी सरपंच लीलाधर भोयर यांच्या गटाचे तीन सदस्य निवडून आले आहेत या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे .
कोराडी जिल्हा परिषद सर्कल मधील कोराडी , लोंनखैरी या दोन्ही ग्रामपंचायती भाजप समर्पित गटाचे स्पष्ट बहुमताने विजय झाल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कभाले यांना जबरदस्त फटका बसल्याचे दिसून येत आहे येरखेडा भिलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील घोरपड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास आघाडीच्या ९ च्या ९जागा जिंकून एक हाती विजय मिळविलेल्या मुळे जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी आपला गड कायम ठेवला आहे . पवनगाव धरणगाव गट ग्रामपंचायत च्या ९ जागा साठी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास आघाडी ९ च्या नव ही जागा जिंकुन एक हाथी सत्ता कायम ठेवली असुन या ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीला खांत ही उघडता आले नाही . महालगाव गट ग्रामपंचायत 10 जागे साठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत महाविकास आघाडी पॅनल ने 4 जागा जिंकून मोठा पक्ष मणून पुढे आला तर नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीला केवळ ३ जागेवर समाधान मानावे लागले असुन या ग्रामपंचायती मध्ये ३ अपक्ष उम्मेदवारांनी बाजी मारल्याने कोणत्या गटाचा सरपंच विराजमान होणार हे सांगणे कठीण झाले आहे आहेत. याच ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रवीण धांडे उम्मेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याने त्या जागेची निवडणूक रद्द करण्यात आली होती . महालगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक २ सर्वसाधारण जागेतून जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता अनिल निधान यांचे बंधू भगवान निधान ३७० मते घेऊन विजयी झाले आहेत. महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसल्याचे दिसून येत आहे खेडी ग्रामपंचायत च्या ९ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडी ने ८ जागा जिंकून निर्विवाद पणे एक हाती सत्ता कायम ठेवली असुन तर काँग्रेस समर्थक गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले .कामठी तालुक्यातील टेमसना ग्रामपंचायत च्या ९ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नागपूर जिल्हा परिषद चे माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे यांच्या आदर्श महाविकास आघाडी गटाने सहा जागा जिंकून निर्विवाद पणे स्पष्ट बहुमत मिळविले असुन याच ग्रामपंचायतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच मनोहर कोरडे यांनी किसान विकास पॅनल उभा करून ३ जागांवर विजय मिळविला . तश्र भाजपला या ग्रामपंचायत मध्ये खाताही उघडते आले नाही , या ग्रामपंचायत वर गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस समर्थीत गटाचे वर्चस्व आहेत या ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक एक मधून माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे यांचे चिरंजीव अनिकेत शहाणे आदर्श ग्राम विकास आघाडीकडून अरविंद केशवराव शहाणे किसान विकास आघाडीकडून अरविंद केशवराव शहाणे हे तीनही शहाणे कुटुंबातील उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात होते त्यात माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे यांचे चिरंजीव अनिकेत शहाणे यांनी २८७ मते घेऊन अरविंद केशवराव शहाणे यांचा १७१ मतांनी पराभव करून विजय संपादन केला .
केसरी ग्रामपंचायतीच्या सात जागेसाठी झालेल्या निवडणुकीत येथे काँग्रेस समर्थित महाविकास आघाडीचे ७ ही उमेदवार विजयी झाल्याने निर्विवादपणे एक हाती सत्ता मिळवली असुन काँग्रेसने सत्ता परिवर्तन केले . भाजप समर्थित गटाला या ग्रामपंचायतीत खातेही उघडता आले नाहीत
भमेवाडा ग्रामपंचायत ७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास आघाडीने ७ जागा जी जिंकून निर्विवाद पणे एक हाती सत्ता मिळवली या ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून काँग्रेस गटाचे वर्चस्व होते भाजपला सत्ता परिवर्तन करण्यात यश मिळाले आहेत .
भामेवाडा या ग्रामपंचायत मधून विद्यमान सरपंच कविता सुरेश बांगडे ह्या वार्ड क्रमांक ३ मधून तर त्यांच्या सूनबाई शिल्पा नितीन बांगडे ह्या वार्ड २ मधून निवडणूक रिंगणात होत्या दोघेही सासूबाई सुनबाई पराभूत झाल्या .

कामठी तालुक्यात विजयी झालेल्या उम्मेदवारांनी आप आपल्या गावात विजय मिरवणूक काढून विज्योसत्व साजरा केला . निवडणूक अधिकारी व तहसीलदार रवींद्र हिंगे यांनी निवडणुकीची मतमोजणी ची व्यवस्था नियोजन व्यवस्थित रित्या केल्यामुळे मतमोजणी सुरळीत पडली त्यांना नायब तहसीलदार एस एन कवटी, रणजीत दुसवार, आर टी उके, निवडणूक अधिकारी म्हणून कश्यप सावरकर ,एस जी कातोरे ,मनीष दिघोळे यांनी सहकार्य केले . तर निवडणुक मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवीन कामठीचे ठाणेदार सतीश मेंढे जुनी कामठीचे ठाणेदार विजय मालचे यांनी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त लावला होता .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …