*आठवडी बाजार व खेळायला जागा देण्याची मागणी*
*नप उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांचे वेकोलि प्रशासनाला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी शहर गेल्या खुप वर्षापासुन विविध विकास कामाने दुर असुन कन्हान ग्रामपंचायत चे रुपांतर नगर परिषद मध्ये होऊन सहा वर्ष झाल्या वर ही आठवडी बाजार व मुलांसाठी खेळाचे ग्राऊंन्ड नगर परिषद प्रशासनाने उपलब्ध करुन न दिल्याने शहरातील आठवडी बाजार आज ही नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वर बसत असल्याने कधीपण मोठ्या दुर्घटनाची दाट शक्यता वाढली असल्याचे चित्र दिसुन येत कन्हान – पिपरी नगरपरिषद चे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी वेकोलि प्रशासनाला एक पत्र देऊन आठवडी बाजार व खेळायला जागा देण्याची मागणी केली आहे .
सोमवार दिनांक ११ जानेवारी ला सायंकाळ च्या सुमारास कन्हान – पिपरी नगरपरिषद चे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी नगर परिषद कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले कि कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या जवळ आठवडी बाजार , मुलांसाठी खेळायला ग्राऊंन्ड व मनोरंजन करिता जागा नसल्याने नगर परिषद ची डोके दुखी वाढली असुन शहरात नागरिकांची संख्या दिवसन दिवस वाढत आहे . स्थानिय लोकांकरिता मुलभुत सुविधांची गरज पडली असुन कन्हान रायनगरात असलेल्या दखने हायस्कुल जवळ वेकोलि च्या जागेवर आठवडी बाजार व मुलांसाठी खेळायला ग्राऊंन्ड साठी जागा देण्याची मागणी नगर परिषद चे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी वेकोलि प्रशासनाला एक पत्र देऊन केली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज