Breaking News

*तीन दिवसीय योग शिबीर संपन्न* *पतंजलि योग समितीचे आयोजन*

*तीन दिवसीय योग शिबीर संपन्न*


*पतंजलि योग समितीचे आयोजन*

विशेष प्रतिनिधि
ब्रम्हपुरीःपतंजलि योग समिती ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर चे वतिने कौतुकबाबा देवस्थान नान्होरी, ब्रम्हपुरी येथे त्रीदिवसीय योग शिबीरात योग प्राणायाम चे मार्गदर्शन करतांना निरोगी, स्वस्थ, व रोगमुक्त , इम्युनिटि वाढविण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक आहे असे भगवान पालकर जिल्हा प्रभारी पतंजलि योग समिती यांनी संबोधित केले.

नरेश ठक्कर तहसिल प्रभारी, , डॉ. नरेश बावनकुळे प्रभारी चिकित्सक , रुद्राक्ष राऊत यांनी सुध्दा लोकांना योगाचे धडे गिरविले. उत्कृष्ठ प्रदर्शनाबददल योगेश्वरी, तन्नवी, दिनेश डोर्लीकर, यशवंतराव भांडारकर यांना योग संजीवनी देवुन भगवान पालकर यांनी सन्मानीत केले.योग शिबीर यशस्वी होण्यासाठी ह.भ.प.बाळकृष्ण तलमले महाराज, यशवंतराव भांडारकर, दिनेश डोर्लीकर, पुंडलीक ठाकरे, रमेश ठाकरे, पांडुरंग जमनकर, जिवन कोलते, जागोजी कोलते यांचा सहभाग लाभला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …