Breaking News

*खापरखेडा सराईत गुन्हेगाराची गळा चिरून हत्या*

*खापरखेडा सराईत गुन्हेगाराची गळा चिरून हत्या*


नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले
खापरखेडा:- स्थानिक पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरील मुख्य बाजारपेठेत एका सराईत गुन्हेगाराची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली त्यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले.

मृतकाचे नाव प्रशांत मुकेश घोडेस्वार वय 32 वर्ष राहणार वार्ड नंबर 4, खापरखेडा असे आहे. मृतक प्रशांत मुख्य बाजारपेठेतील राजबाबा बियर बार मध्ये रात्रीच्या सुमारास दारू पीत होता अशी माहिती आहे मात्र अचानक रात्री दहा वाजताच्याजवळ पास मोहन किराणा दुकाना समोर अज्ञात आरोपीने त्याची गळा चिरून हत्या केली. खापरखेडा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती प्राप्त होताच खापरखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भटकर यांच्या संपूर्ण ताफा घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …