*72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण*
*कोरोना योध्दांचा शासकीय कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊण सन्मान*
सावनेर प्रतिनिधी – दिनेश चौरसिया सोबत शुभम ढवळे
सावनेरः 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे सकाळ पासूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांची चिवचिवकट व प्रभात फेरीचा उत्साह कोरोना संक्रमणामुळे दिसून आली नसुन मधुर देशभक्ती गीतांचा कर्णप्रीय आवाज प्रत्येक शासकीय निम शासकीय कर्मचारी व नेते मंडळाची ध्वजारोहणाची लगबग तर हातात झंडे घेऊण मोटरसाईकल रस्त्यावर ओसांडून पडणारी तरुणाईं व देशप्रेम हे या दिनाचे विशेष वैशिष्ट्य असते त्यावर ही कोरोनाचे सावट दिसून आले*
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे हस्ते व स्वातंत्रतेचे प्रतीक माणले जाणारे जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांचे हस्ते सचिव विजय बसवार यांचे उपस्थितीत शेकडो गणमान्यांच्या उपस्थितीत सामुहिक ध्वजारोहण पार पडले.
सकाळी 9-30 ला नगर परिषद हायस्कूल च्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार चैताली दराडे,पो.नी.अशोक कोळी,नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे,दुय्यम निबंधक किशोर बन्सोड,नायब तहसीलदार गजानन जवादे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत नगरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस पथक,होमगार्ड पथक,एनसीसी पथक आदिंनी पथ संचालन करुण राष्टध्वजाला मानवंदना दीली.ध्वजारोहणानंतर कोरोना काळात पोलोस विभाग,आरोग्य विभाग, नगर पालिका सफाई विभागाच्या कर्मचारी यांनी आपल्या जिवीतेची पर्वा न करता कोराना काळात सेवेत स्वताला वाहून घेणार्या “कोरोना योध्दांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊण सन्मानित छर स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.
जयस्तंभ बाजार चौक येथे संपन्न ध्वजावंदनास नगर परिषद हायस्कूल सावनेर,सुभाष प्राथमिक शाळा हिंन्दी ,मराठी, अभ्यंकर प्राथमिक शाळा,पलीया हिंन्दी आदी शाळेचे विद्यार्थी शिक्षकवुंदा सह नगर सेवक सुनील चाफेकर,दिपक बसवार,निलेश पटे,शपीक सैय्यद, माजी नगर सेवक तेजसिंग सावजी,लक्ष्मीकांत दिवटे,शैलेश जैन,गोपाल घटे,प्रा.अश्विन कारोकार,दिलीप घटे,सादिक शेख,इमरान शेख,रवी काळबांडे,दिलिप फाले,ललित कुमार हंसराज,श्री खुबाळकर,सुमुख लाखानी आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
पाणी पुरवठा विभागाचे ध्वजारोहण नगर पालीकेचे उपाध्यक्ष अँड् अरविंद लोधी यांचे हस्ते नगराध्यक्षा सौ रेखाताई मोवाडे,वरिष्ठ भाजप नेते रामराव मोवाडे तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका,नगर परिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
*शासकीय कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र उबाळे यांनी तर अमोल देशपांडे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सुजित आढे,अनिल भोसले सह तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले*
Maharashtra News Media सच की आवाज