Breaking News

*आमडी ला महिलांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळा संपन्न*

*आमडी ला महिलांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळा संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुका कृषी कार्यालया च्या वतीने कन्हान मंडळ अधिकारी श्री जी.बी वाघ हयांनी आमडी येथे महिला शेतक-यांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळेचे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना गहु पिक व्यवस्थापन व इतर शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.


गुरूवार दिनांक.२१ ला पारशिवनी तालुका कृषी कार्यालय, कन्हान मंडळ अधिकारी व ग्राम पंचायत आमडी यांच्या संयुक्त विद्यमाने आमडी येथे महिला शेतक-यांन करिता गहु पिकाचे व्यवस्थापन विषयी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. आमडी सरपंचा सौ शुभांगीताई भोस्कर यांच्या अध्यक्षेत व ग्राम पंचायत सदस्या सौ.शिलाताई सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये कन्हान मंडळ अधिकारी श्री.जी बी वाघ हयांनी सदर शेती शाळेत गहु पिक वाढीच्या अवस्था सांगुन त्या नुसार पाणी व्यवस्थापन, कापुस फरदड न घेणे तसेच अवशेष निर्मूलन, हरभरा पिकावरील घाटे अळी एकात्मिक नियंत्रणासाठी पक्षी थांबे, फेरोमन ट्रॅप लावणे, उन्हाळी सोयाबीन लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, नाडेप, गांडूळ आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या शेती शाळेचा परिसरातील महिला शेतक-यांनी बहु संख्येने उपस़्थित राहुन लाभ घेतला. शेतकरी मासिकांचे वाटप करून कार्य क्रमाची सांगता करण्यात आली. शेती शाळेच्या यशस्विते करिता कन्हान मंडळ कृषी अधिकारी श्री जी. बी. वाघ सर, कृषी पर्यवेक्षक श्री. एस. पी. कुबडे सर, कृषी सेवक राठोड, ढंगारे व ग्राम पंचायत आमडी च्या कर्मचा-यांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …