Breaking News

★पतंजली योग समितीच्या वतीने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध ★

पतंजली योग समितीच्या वतीने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध


माती परीक्षणासाठी तालुक्यात करणार २०० युवकांची निवड

तालुका वार्ताहर/ कुही

पतंजली योगपीठ हरिद्वारच्या वतीने नागपूर येथील मिहान मध्ये लवकरच उद्योग निर्मितीला सुरुवात होत असून मृदा (माती)परिक्षणापासून या शेतीउद्योगाची सुरुवात होत आहे.यामुळे तालुक्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.अशी माहिती भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समितीचे जिल्हा समन्वयक भाई प्रदीपजी काटेकर यांनी कुही तालुका पतंजली योग समितीच्या बैठकीत दिली.
  त्यांनी सांगितले की,पतंजली योगपीठ नागपूर येथील मिहान परिसरात पतंजली योग समितीच्या वतीने मृदा(जमीन) परिक्षण करणे सुरू आहे यासाठी प्रत्येक तालुक्यातील १०० गावांची निवड करण्यात आली आहे.या १०० गावांतून प्रत्येकी दोन स्वयंसेवक असे २०० स्वयंसेवकाची निवड करावयाची आहे.यासाठी १८ ते ३० वयोगटातील किमान बारावी किंवा पदवीधर युवक निवडायचे आहे.इच्छुकांनी दि.१७ सप्टेंबरला सकाळी ८ ते १० च्या वेळेत माती परिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.व निवड झालेल्या युवकांना योग्य मानधन देण्यात येणार आहे.तरी इच्छुकांनी आपले  सर्टिफिकेट्स,आधारकार्ड व एक पासपोर्ट साईड्सचे फोटो घेऊन मांढळ येथील राममंदिरात दि.१७ सप्टेंबर २०१९ रोज  मंगळवारला उपस्थित राहावे, असे आवाहन   प्रदीप घुमडवार तालुका प्रभारी,भारत स्वाभिमान ट्रस्ट तथा पतंजली योग समिती,कुही तालुका याांनी केले आहे.यासाठी मो.नं.7385736361 व 9403065041या नंबरवर संपर्क करावा.

Check Also

*पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली भव्य विजयी मिरवणूक*

🔊 Listen to this *पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली …