Breaking News

*शिवसेनेचा आंतरकलह खदखदला* *शिवसेना जिल्हा प्रमुखावर निक्रियता व शिवसेनेला प्रायवेट लीमीटेड बनविण्याचा पत्र परिषदेत वरिष्ठांचा खनखनीत आरोप*

*शिवसेनेचा आंतरकलह खदखदला*

*शिवसेना जिल्हा प्रमुखावर निक्रियता व शिवसेनेला प्रायवेट लीमीटेड बनविण्याचा पत्र परिषदेत वरिष्ठांचा खनखनीत आरोप*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांना डावलले जात असल्याने शिवसेनेचे प्रस्थ हळुहळु कमी होत असल्याचे आरोप शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकार्यांनी पत्रपरिषदेत लावले.

विश्राम गु्ह सावनेर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय पत्रपरिषद वरिष्ठ शिवसेना नेता विनोद जिवतोडे,उत्तम कापसे,किशोर राय (नरखेड),रितेश हेलोंडे (काटोल),संतोष केचे (हिंगणा) आदिं सह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील वरिष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडली या पत्रपरिषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजु हरणे व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांच्यावर त्याच्ंच्या निश्क्रीयतेमुळे जिल्ह्यात शिवसेना रसातळाला जात असुन सामान्य शिवसैनिक तर सोडाच परंतु जिल्ह्यातील विधानसभा, तालुका प्रमुख,शहर प्रमुख आदिंना सुध्दा डावलले जात आहे,जुन्या वरिष्ठ व अनुभवी पदाधिकाऱ्यांना हेतू परस्पर डावालून,त्यांना अपमानास्पद वागणूक देणे,आपल्या मनमर्जीच्या लोकांना संघटनेत स्थान देऊण जिल्हा शिवसेनेला “लिमिटेड कंपनी” बनविण्याचे कटकारस्थान जिल्हा प्रमुख करत आहेत त्यामुळे पक्षनिष्ठ शिवसैनिकांनी मागील नऊ वर्षापासून कार्यरत नागपुर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी एका सुरात करत पक्षश्रेष्ठींनी सदर विषयावर जातीने लक्ष देऊण सदर प्रश्न मार्गी लावावा अशी विंनी याप्रसंगी शिवसेनेचे वरिष्ठ नेते उत्तम कापसे यांनी केली आहे.

*याप्रसंगी संदिप बरडे (माजी तालुका प्रमुख नरखेड),शिवसेनेचे माजी सरपंच नामदेव मोरे,खापा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक भुपेन्द्र कोसे,विजय पोटोडे, तिलक क्षिरसागर, संजय गिरमेकर,रविंद्र काटकर,दिवाकर कडू,लाला यादव,जितू बिंदानी,छोटु सिंग,मिलिंद कुर्वे,रोशनी चौधरी,विशाखा शेलारे,राधेश्याम गावंडे,शिवदीन देशमुख, प्रशांत कामोने,आशिष धोटे,युवराज कुंभारे, आशिष धांडोळे,सुहास लाड,स्वप्नील लाडेकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …