Breaking News

*राष्ट्रीय पल्स पोलीओ अभियानाचा पहिला टप्पा संपन्न* *शहरात 19 स्थाईक तर दोन फीरत्या पथकाने केले लसिकरणास*

*राष्ट्रीय पल्स पोलीओ अभियानाचा पहिला टप्पा संपन्न*

*शहरात 19 स्थाईक तर दोन फीरत्या पथकाने केले लसिकरणास*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी दि.31 जानेवारी 2021 रोजी असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी शहरातील जवळपास 3500 चिमुकल्यांना सकाळ पासुन पोलीयोचे डोज देण्यास सुरुवात केली .त्या अनुषंगाने शहरातील शाळा,विद्यालय, महाविद्यालय, मंदिरे इत्यादी 19 स्थाईक ठीकाणी तर 2 फिरते पथकाव्दारे शहरातील विविध ठीकाणी असलेले परिवार,बेट बिगार इत्यादींचा पाच वर्षाखालील मुलांना पल्स पोलीओ लसीकरणाचे डोजेस देऊण चिमुकल्यांचे पोलीओ आजारापासुन संरक्षण व्हावे याकरीता परिश्रम घेतले*

*सदर राष्ट्रीय पल्स पोलीयो लसिकरण मोहीमेच्या यशस्वीते करिता प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप गुजर,डॉ. अभिनव कळमकर, डॉ. शुभ्रा जोशी,डॉ. हरिष बरैय्या,श्रीमती सुनीता येटे ,अमोल घटे,मनिष खरोने,सौ.खंते,अतुल पारधी, शैलेश वहाने,घनश्याम तुर्के,निलेश राठोड़,किशोर गोमकाळे,विजय खिल्लारी,गुणेश्वर ठाकरे,बेबीबाई भेलावी,गणेश च़ादेकर सह प्राथमिक आरोग केन्द्र सावनेरचे आरोग्य कर्मचारी अधिकारी आदी सह नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी सहभाग घेऊण पल्स पोलीयोचे राष्ट्रीय पर्व सफलतार्थ परिश्रम घेतले*

*पल्स पोलीओ अभियानाला लागले गालबोट*

 

*सावनेर प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्राच्या वतीने शहरातील 19 स्थाईक तर दोन फीरत्या पथकाव्दारे शहरातील पाच वर्षाखालील बलकांना या पल्स पोलीओ अभियानांतर्गत पल्स पोलीओचे औषध पाजण्यात येणार असल्याने वरिल सर्व चमुंनी या राष्ट्रीय अभियानात स्वताला वाहुन घेतले होते अश्यात सदर आयोजन व्यवस्थित सुरु आहे की नाही याची खात्री करुण घेण्याकरिता प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेरचे प्रपाठक डॉ. प्रविण मेश्राम व डॉ. हेमंत नगराळे आपल्या खाजगी वहानानी फीरत होते त्या दरम्यान एका फिरत्या वहानास प्रपाठक साहेबांनी तर दुसरे वाहन डॉ अभिनव कळमकर यांचे सुचनेनुसार त्यांनी दिलेल्या संकेत स्थळावर जात असतांना सदर दोन्ही फीरत्या पथकाचे दोन्ही वाहने एकाच मार्गावर दिसताच बडे साहेब म्हणजे प्रपाठक डॉ.पवन मेश्राम नव्हे तर प्राथमिक आरोग्य केन्द्रावर प्रसुतीतज्ञ म्हणून कार्यरत डॉ हेमंत नगराळे यांचा ताप अनावर झाला व त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना अवाच्य भाषेचा भडीमार करत जा ज्याचे जवळ ज्यायचं त कोणीही माझं काही उपडू शकत नाही असे खडे बोल सुनवत अश्चिल शिविगाळ केल्याचा प्रकार घडल्याने आपल्या चिमुकल्यांना पोलीयोचे डोज पाजण्यास घेऊण येणार्यांना “बर झालं बापा आपण अशिक्षित आहो तर” चा भास नक्कीच जानवला*

*सदर घटनास्थळावरुण प्रपाठक व भडकलेले डॉक्टर साहेबयांनी आरोग्य केन्द्रावर पोहचुन आपल्या अधिनस्त आरोग्य कर्मचारी, अधिकारी व आरोग्य सेवकांसह तेथे उपस्थित वरिष्ठ डॉक्टरांना ही “तुझं दात उपडायचं काम आहे ,तु फक्त उपड़” अश्या खड्या भाषेचा पाहुणचार केला याप्रसंगी प्रपाठक महोदय मात्र बघ्याच्या भूमिकेत होते हे विशेष तर डॉ. हेमंत नगराळे हे आपल्या सवयी प्रमाणे नशेत असल्याची विश्वसनीय व धक्कादायक माहीती पुढे येत आहे*

*सदर विषयाची उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी व आरोग्य सेवकांनी आजच्या उरलेल्या वेळेवरही सदर राष्ट्रीय पल्स पोलीओ अभीयानास पुर्तत्वास नेऊण आपण खरे आरोग्य सेवक असल्याचा परिचय देत घडलेल्या या प्रकाराची तक्रार मा.जिल्हाधिकारी नागपुर, मा.अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी,मा.उपविभागीय अधिकारी सावनेर,मा.तहसीलदार सावनेर,मा.पोलीस निरिक्षक सावनेर सह वरिष्ठांना करुण न्याय मागण्याच्या तयारीला लागले*

*तर सदर विषयावर आमचे स्थानिक प्रतिनिधींनी सदर घटनेसंदर्भात प्रपाठक डॉ पवन मेश्राम यांच्याशी भ्रमनध्वनी वर विचारना केली असता सदर अनुचित प्रकार घडल्याची कबुली देत त्यावर उपाययोजना व योग्य कारवाई करण्याची हमी दिली*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …