*जीटीएनच्या कामगार व कर्मचाऱ्यांतर्फे राम मंदिर निर्माण करीता आर्थिक सहयोग*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया
सावनेर – आयोध्या राम मंदिर बांधकामाच्या आर्थिक सहयोगासाठी मंदिर निर्माण समर्पण निधी समिती सावनेर अंतर्गत तालुक्यात आर्थिक सहयोग अभियान राबविण्यात येत आहे यात संस्था व नागरिकांच्या भेटी घेऊन निधी उभारला जात आहे या समितीने जीटीएन व्यवस्थापना सोबत संपर्क साधल्याने जीटीएन कार्पोरेट ऑफिस कडुन भरघोस अनुदान देण्यात आले परंतु खुरजगाव येथील जीटीएन कंपनीचे कामगार, कर्मचारी, व कामगार संघटनेचा या श्रीराम मंदिराचे निर्माण कार्यात हातभार लागावा म्हणून कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बसवार यांनी आर्थिक सहयोगासाठी आवहान केले होते.त्यामुळे जीटीएनच्या कामगार व कर्मचाऱ्यांनी बसवार यांच्या आवहानास प्रतिसाद देऊन 41 हजार रूपयांंचा निधी जमा केला.
या जमा राशीचा धनादेश श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण समर्पण निधी समिती सावनेर कार्यालयाच्या सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी व्यवस्थापनातर्फे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत मिटकर, सुरेंद्र महंत (एच आर), किरण चोपडे, रविंद्र कुथे,भारतीय जीटीएन कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बसवार, मंदिर निर्माण समर्पण समितीचे धनंजय मुलमुले ,अँँड.मनोज खंगारे, अँड.अभिषेक मुलमुले, प्रवीण नारेकर,अभिषेक सिंग गहरवार, आशिष मानकर,डॉ.नितीन पोटोडे उपस्थित होते.
सावनेर मंदिर निर्माण समर्पण समिती ला धनादेश देतांंना जीटीएन कामगार संघटनेचे नेते विजय बसवार व इतर मान्यवर यांची उपस्थिति.
Maharashtra News Media सच की आवाज