Breaking News

*सावनेर कळमेश्वर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन* *पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदारांचा पुढाकार*

*सावनेर कळमेश्वर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन*

*पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदारांचा पुढाकार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेरः आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित अशिक्षित युवक युवतींना योग्य रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सतत प्रयत्नशील असनारे क्षेत्राचे आमदार व राज्य शासनात पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने दि.07 फेब्रुवारी रोज रविवार ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.7 फेब्रुवारी ला संपन्न होणाऱ्या या भव्य सुशिक्षित बेरोजगार मेळाव्यात राज्यातील अनेक नामांकित कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी सहभागी होत असुन क्षेत्रातील 10 वी,12 वी पास औद्योगिक प्रशिक्षण प्राप्त बेरोजगार युवक युवतींची निवड व नियुक्ती करुण त्यांना रोजगार उपलब्ध करुण देणार असल्याने सदर शिबिराचा बेरोजगार युवक युवतीने अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती जिल्हा परिषद नागपुर चे उपसभापती मनोहर कुंभारे,सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे,शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल, नगरसेवक सुनील चाफेकर,मनोज बसवार सह सुनील केदार मीत्र परिवार आदिंनी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …