*रामटेक – भंडारा राज्य महामार्गावर धर्मपुरी येथील बस स्टाप वर सोई सुविधांचा आभाव एच जी इन्फ्रा कंपनीचा भोंगळ कारभार.*

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
*धर्मपुरी वार्ताहार – राजु मदनकर*
*धर्मपुरी येथील सिमेंट रस्त्याचे काम रामटेक – खात – भंडारा रोड चे काम शेवटच्या टप्प्यात आले असून (1)धर्मपुरी येथे बस स्टाप नाही,पीण्याच्या पाण्या करीता बोरिंग नाही,रस्ते दुभाजक लावलेलं नाही,कठडे लावलेली नाही,बोगदा व सर्विस रोड काढलेला नाही,पथदिवे खांब लावलेली नाही . उदा ॥ अरोली व सतौन्ह येथे सुविधा केली तशी सुविधा धर्मपुरी , इजनी , या गावांसाठी केलेली नाही गट ग्रामपंचायत ठराव देते वेळी , काम करून देण्याची तयारी एच जि इन्फ्रा कंपनी करार केलं होतं परंतु तशी सुविधा न केल्याने येथील अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .कंपनी आता टाळाटाळ करीत आहे रोड ची उंची पूलमूले 15ते 20फूट उंची केल्यामुळे गावातील घरे 15 फूट खाली गेलेली आहेत त्यामुळे नागरिकांना गाड्या वर ठेवावे लागते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे अपघात होण्याची संभावना आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी मौका चौकशी केली असता 8 दिवसात काम करून दिल्याचे आश्वासन दिले होते परंतु 15 दिवस लोतुनही काम झलेले नाही नागरिक टक लाऊन बसलेले आहेत ..सदर कंपनीचे काम संपुष्टात येत आहेत अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत मागील वर्षी त्याच ठिकाणी 3-4 अपघात होऊन म्रुत्यु झलेले आहेत .यावर तत्काळ उपयोजना करण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज