*भाजप ने राज्य सरकार च्या विरोधात महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकुन केले हल्लाबोल आंदोलन*

*कन्हान – कामठी येथे भाजपा पदाधिकार्यांनी राज्य सरकारचा विरोधात नारेबाजी करत विजबिलाजी होळी जाळली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी महावितरण अधिकार्यांना ७५ लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले असता याचा निषेधार्थ भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंन्द्रकांत दादा पाटील , व सरचिटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात भाजप ने राज्य सरकार च्या विरोधात नारेबाजी करत ठिक – ठिकाणी भाजपा पदाधिकार्यांनी महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकुन राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केले .
कन्हान – महावितरण अधिकार्यांनी ७५ लाख वीज बिल ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचे नोटीस पाठवुन महाराष्ट्रातील ४ कोटी गरीब जनतेला अंधारात टाकणार्या महावितरणाचा व राज्य सरकारा च्या विरोधात भाजपा पारशिवनी तालुका च्या वतीने कन्हान येथे महावितरण कार्यालय समोर भाजपा नागपुर जिल्हा महामंत्री अविनाशजी खळतकर यांचा नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोध करुन विजबिलाची होळी जाळली व महावितरण अभियंता उपविभागीय कार्यालय कन्हान चे अधिकारी यांना एक निवेदन देऊन लाॅकडाऊन काळातील तीन महिन्याचे विद्युत वीज बिल माफ करण्याची मागणी केली .

यावेळी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, माजी नप नगराध्यक्ष शंकर चहांदे , भाजपा नेता राजेश ठाकरे , रामभाऊ दिवटे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, कन्हान – पिपरी नप विरोधी पक्ष नेता राजेंद्र शेंदरे, सरिता लसुंते, स्वाती पाठक, लक्ष्मी लाडेकर, कामेश्वर शर्मा, संजय चोपकर, गुरुदेव चकोले, शेखर गिऱ्हे, रानु शाही, अजय लोंढे, प्रमोद वंजारी, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे, लोकेश अंबाळकर, विलास लसुंते, सुनिल साखरे, मालु ठाकरे, माया राऊत, कविता पाली सह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते .
*कामठी मध्ये भाजपा पदाधिकार्यांनी महावितरण कार्यालयाला लावले कुरुप*

कामठी – भाजपा कामठी शहर द्वारे अनाज गोडाऊन जवळ रामगड प्रभाग 15 नवी कामठी येथे असलेल्या एम.एस.ई.बी. महावितरण कार्यालया च्या समोरभाजपा नेता संकेत बावनकुळे,शहर अध्यक्ष संजय कनोजिया, कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल, व महामंत्री उज्वल रायबोले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राज्य सरकार च्या विरोधात नारेबाजी करत मुख्य प्रवेशद्वारा ला कुलूप ठोकुन 300 युनिट वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन देऊन शब्द फिरविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला असुन महावितरण कार्यालय समोर वीज बिलाची होळी जाळुन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले . आंदोलनात सुनील खनवानी, लालसिंग यादव,रमेश वैद्य,राज हडोती,कपिल गायधने,विजय कोंडूलवार,रणजित सोनानी,रामसिंग यादव,विरेंद्र राऊत,राजेश दुबे,पृथ्वीराज दहाट,विक्की बोंबले, गोपाल सिरीया,विमल झमतानी, रवि तामसेटवार,नितु दुबे,राजेश पाटील,अरूण पौणिकर,संतोष धुरीया,प्रल्हाद सोनवणे,संध्या रायबोले, जया चंद्रिकापुरे, विद्या बोंबले,सविता गायकवाड, शशिकला मैंद,अलका गोंडाने, पूजा धरमगडे,खोमिन शाहु,निशा मेश्राम, विमल बघेल, खोमेश्वरी शाहु,शकुंतला निनावे, वैष्णवी टोंगसे,कनिजा बेगम,शबनम बानो, नसीम बानो सह अनेक भाजपा कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज