*जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी युवा स्वाभिमान पार्टी व घरकुल धारका च्या निवेदनाची घेतली दखल*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
वर्धा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी युवा स्वाभिमान पार्टी व घरकुल धारका च्या निवेदनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अभिजित फाळके यांना घरकुल धारकांची बैठकी चा अहवाल घ्यायच्या सूचना, लवकरच सदर विषयावर मंत्रालयात बैठक दिनांक 3 तारखेला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष परिवार संवाद यात्रेला आर्वी येथे आले असता युवा स्वाभिमान पार्टी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या पुढाकारात महिला ता. अध्यक्षा, सौं रेखा वानखेडे, संघटिका सौं भारती पोटफोडे, शहराध्यक्षा सौं प्रमिला हत्तीमारे, यांच्या नेतृत्वात निवेदन दिले होते, त्याची च दखल घेत आज दिनांक 07/02/2021 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय श्री, अभिजित फाळके पाटील यांना आर्वी येथील घरकुल धारक पीडित लाभार्थ्यांची भेट घेऊन अहवाल घेऊन मुंबई ला पोहचण्याचा सूचना, घरकुल धारक शेकडो नागरिक बैठकीला उपस्थित महिला आघाडी ने खालील आशयाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिजित फाडके मार्फत निवेदन सादर करत विषय निकाली काढण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी केली यावर अभिजित फाडके पाटील यानी तातडीने हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी स्वतंत्र बैठक लावून मार्गी लावण्याचा विश्वास दिला.
Maharashtra News Media सच की आवाज