Breaking News

*पाटणसावंगी ग्रामपंचायत मध्ये महिला राज* *सरपंच पेक्षा उपसरपंच पदाची चर्चा जोरात*

*पाटणसावंगी ग्रामपंचायत मध्ये महिला राज*


*सरपंच पेक्षा उपसरपंच पदाची चर्चा जोरात*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

पाटणसावंगी – तालुक्याचे सत्ता केंद्र असलेल्या पाटणसावंगी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने येथील ग्रामपंचायतवर महिला राज स्थापन होणार आहे.

सावनेर तालुकाच नव्हेतर नागपुर जिल्ह्यासह विदर्भाच्या राजकारणाचे केन्द्रबिंदू मानल्या जाणाऱ्या राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे गु्हनगर पाटनसावंगी येथे महिला सरपंच होत असल्याने सरपंच पदाच्या चर्चेसोबतच उपसरपंच पदाची चर्चा जोरात रंगत आहे.

पाटनसावंगी ग्रामपंचायत येथील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये १५ काँग्रेस समर्थीत तर २ भाजप समर्थीत उमेदवार निवडून आले त्यात ७ पुरुष १० महिला सदस्यांचा समावेश आहे.महिलांमध्ये सरपंच पदासाठी रोशनी सुधीर ठाकरे व सिमा चंद्रशेखर केदार यांचे नाव चर्चेत असुन रोशनी ठाकरे यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत तर सीमा केदार यांचे पती वेकोली सावनेर येथे नोकरीत आहे.नागरिकांच्या मते सरपंच महिला असलेल्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपद ही तितकाच महत्त्वाचे असल्याने सरपंच पदापेक्षा ही उपसरपंच पदाची जोरदार चर्चा गावात होत आहे.

सलग दोनवेळा निवडून आलेले दीपक दलाल, हारून शेख, प्रशांत बरडे यांच्या नावाची चर्चा उपसरपंचाच्या पदाकरिता पुढे ये असुन त्यातील दीपक चक्रधर दलाल हे बाजार चौक परिसरात सदस्य असून उच्च शिक्षित, पत्रकार, अनुभवी आहे,त्यांनी मागील पंचवार्षिक कारकिर्दीत आपल्या वार्डात अनेक कामे केली असल्याने त्यांना दुसऱ्यांदा जनतेनी निवडून दिले आहे.मंत्री सुनील केदार गटाने यांनी त्यांना २०१५ च्या निवडणुकीत उपसरपंच पदाचे उमेदवार केले होते परंतू संधी हुकली होती त्यामुळे या वेळेस दीपक दलाल त्या पदासाठी योग्य असून यावेळेसउपसरपंच पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल अशी गावात जोरदार चर्चेत बोलले जात आहे.

हारून शेख हे व्यापारी असून पहिल्यांदा निवडून आले आहे तर प्रशांत बरडे हे पण व्यापारी व प्रॉपर्टी डीलर आहे. ते पण दुसऱ्यांदा काही वर्षाच्या अंतराने निवडुन गेले आहे.सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी ला असून नागरिकांच्या आवडीचा व चर्चेतील की नेत्यांच्या मनातील सरपंच उपसरपंच बनेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

*दिपक दलाल यांची वर्णी लागण्याची शक्यता*

*मनमिळावू स्वभावाचे तसेच जनसामान्यांच्या समस्येवर लक्ष देऊण सोडवण्यासाठी पुढाकार घेणे तसेच मागील पंचवार्षिकेत हलक्याश्याने उपसरपंचाच्या पदावर हुलकनी तसेच कार्यकुशलतेचा अनुभव दिपक दलाल यांना असल्याने यावेळी त्यांचे उपसरपंच बनने तय असल्याचे बोलल्या जात आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …