Breaking News

*फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ठेवले शाळेच्या बाहेर* *के.जाॅन शाळा प्रबंधनाचा निर्लज्ज प्रकार* *पालकांची शिक्षण अधिकार्यांना तक्रार*

*फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ठेवले शाळेच्या बाहेर*

*के.जाॅन शाळा प्रबंधनाचा निर्लज्ज प्रकार*

*पालकांची शिक्षण अधिकार्यांना तक्रार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर: विद्यार्थी तसेच पालकांना कोणतीही पूर्वसुचना न देता विद्यार्थांनाना शाळेत बोलावून फी न भरल्याचे कारण सांगून विद्यार्थांना शाळेच्या गेट बाहेर ठेवण्यात आले.सदर प्रकार के.जाॅन पब्लिक स्कुल खापा रोड, येथे घडल्याने पालकांत रोष व्याप्त आहे.

*कोव्हिड या जागतिक महामारीच्या काळात अचानक लाॅकडाऊन घोषीत झाल्याने अनेकांचे रोजगार हीरावल्या गेले. जवळ होते-नव्हते तेही खर्च झाले. अनेकांच्या जवळ असलेले पैसे कोव्हिड बिमारीत गेले.*

*आजही अनेकांच्या हाताला काम नाही,आत्मनिर्भरतेवर फक्त टि.व्ही.वरच सांगितल्या जात आहे.परंतू प्रत्यक्षात अजून कुणीही आत्म निर्भर झाले नाही.*

*विज वितरणचे कर्मचारी विज खंडीकरण्याची धमकी देत बिल भरण्याचा तगादा लावीत आहे. तर शाळेतील शिक्षक फि भरली नाही म्हणून विद्यार्थांना शाळेत प्रवेश देत नाही. पालक फी भरण्यास तयार आहे परंतू त्यांना काही अवधीची गरज आहे. परंतू शाळा व्यवस्थापन ऐकण्यास तयार नाही यामुळे अनेक पालकवर्गात रोष व्याप्त असून सदर घटनेची तक्रार शिक्षण अधिकारी सावनेर यांस करण्यात आली आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …