Breaking News

*शहिदांना दिली श्रद्धांजली*

*शहिदांना दिली श्रद्धांजली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान –जम्मु – कश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहिद झाले होते . या घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने शिवसेना कन्हान शहर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी नगर कन्हान येथे भारत मातेचा प्रतिमेला हार माल्यार्पण करून व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर, नगरसेवक डायनल शेंडे, नगरसेवक अनिल ठाकरे, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, भारत पगारे, चिंटू वाकुडकर, पवन ठाकूर, अजय चव्हाण, हरीश तिडके, सचिन सहारे, अश्विन बाते, शाहरुख खान, नितीन पाठक, चेतन खेरडे, वैभव तिडके, देवानंद साकोरे, संजय कश्यप, मनीष सोळंकी, शैलेश दिवे, शिव कुरील, कु. पंखुडी पाठक व सर्व कन्हान शिवसैनिक व मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …