Breaking News

*डॉ.अतुल तांदळे C.H.O त्यांच्यावर गुन्हा दाखल करा* *काटोल ,नरखेड शहराततील आरोग्य सेवक संघटने मा.उपविभागीयअधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांना मागणीचे निवेदन दिले*

*डॉ.अतुल तांदळे C.H.O त्यांच्यावर गुन्हा दाखल करा*

*काटोल ,नरखेड शहराततील आरोग्य सेवक संघटने मा.उपविभागीयअधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांना मागणीचे निवेदन दिले*

नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – सी एच ओ डाॅ अतुल तांदळे यांनी स्वतःची बुद्धी गहाण ठेवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोग्य सेवक (M.P.W) त्यांच्याबद्दलची त्यांची स्वतःची प्रतिक्रिया नोंदवून त्यांनी राज्यासह देशातील दिवस-रात्र एक करून आरोग्य सेवा देणाऱ्या संवर्गाचा घोर अपमान केलेला असून त्यांच्या स्वाभीमानाचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचवून त्यांची मानहानी केली आहे.

संपूर्ण आरोग्य सेवकांचा अपमान केल्याप्रकरणी शासनाच्या धोरणाचा व भूमिकेचा देखिल अपमान केला आहे. (एम पी डब्ल्यू) यांच्या आत्मसन्मान व स्वाभिमानाला ठेच पोहोचली असून त्यांचे हे कृत्य गैरकृत्य आहे. अतुल तांदळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड तालुका अंबड जिल्हा जालना येथे कार्यरत आहे .यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र सह देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मा.उपविभागीय अधिकारी व पोलिस उप अधिक्षक काटोल यांना केली. शहरातील सर्व आरोग्य सेवक आरोग्य संघटनेनी काटोल, नरखेड तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात आला आहेत.

यावेळी उपस्थित प्रशांत विरखरे, सुरेश सोनुले, संजय रामावत ,प्रवीण धोटे, विठ्ठल धुर्वे ,चंद्रशेखर बारई. यशवंत सरोदे. हुपेश राऊत, राजेंद्र राऊत ,गणेश जाधव, हेमंत गोंडाणे ,राकेश काळे इतर आरोग्य सेवक कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …