Breaking News

*ठोंबरे कुटुंबावर आलेल्या संकटाना बी.पी.नॅशनल इन्सट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर यांनी दिली आर्थिक व मूलभूत गरजा ची भेट*

*ठोंबरे कुटुंबावर आलेल्या संकटाना बी.पी.नॅशनल इन्सट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर यांनी दिली आर्थिक व मूलभूत गरजा ची भेट*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के
बेलोना – या घोर कल्युगात सुधा माणुसकीला जपणारे आणि माणुसकीला जाणारे अशी भरपूर सामाजिक संस्था, इंस्टूट आपल्या समाजात वावरत आहेत.त्यातलीच एक म्हणजे बी.पी.नॅशनल इंस्टूट ऑफ सो वर्क याना बेलोना येथे गजानन ठोंबरे यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचे संपूर्ण अन्न धान्य,कापूस, तुरी ,कपडे ,दागदागिने,शेतीला लागणारे साहित्य,घरी असलेला कुटिर उद्योग व्यवसाय तसेच काही रोख रक्कम आणि संपूर्ण घर जळले फक्त आणि फक्त अंगावरील घातलेले कपडे फक्त शीलक राहिले असता हे याना कळताच या सोशल वर्क इंस्टूट नी त्यांच्या माध्यमातून या गजानन ठोंबरे कुटूबियाना आर्थिक मदत म्हणून 21,000हजार रुपये तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या महत्वाच्या साहित्याची व अन्नधान्या ची भेट देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष अमलात आणून माणुसकी जोपासली त्यामुळे गजानन ठोंबरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या इंस्टुट चे ऋणी आहेत .

या इंस्टूट च्या सहकार्यामुळे ठोंबरे कुटुंबीयांना संकटातून सावरण्यासाठी ऐक मोलांचे सहकार्य मिळाले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …