Breaking News

*वीज कोसळून मजुराचा मृत्यू *

*वीज कोसळून मजुराचा मृत्यू *

संपादक – योगेश कोरडे

कळमेश्वर – आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान वीज कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अमोल नारायण काखे वय पंचवीस वर्ष असे मृतकाचे नाव असून तो स्थानिक रहिवासी नामदेव क्षीरसागर यांचे गुर चारण्याचे काम करीत होता.आज १८ फेब्रुवारी रोजी तो नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता ब्राह्मणी येथील असलेल्या रीजेंट शाळेच्या समोरील परिसरात गुरे चारत असताना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक कडाक्याच्या विजा सह कडाक्याच्या पावसांला सुरुवात झाली. मृतक अमोल याने आडोसा घेण्याकरिता गजानन महाराज मंदिराच्या लगत असलेल्या निंबाच्या झाडाखाली उभा झाला व एवढ्यातच काळाने झडप घातली व आकाशात विजांचा कडकडाटीतून अचानक वीज कोसळल्याने अमोलचा जागेवरच मृत्यू झाला.

सदर घटनेची सूचना कळमेश्वर पोलिसांना मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्‍वर येथे पाठवण्यात आला सदर प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलिस करीत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …