Breaking News

*चोरीचे रेती वाहतुकीने घेतला परत एक जीव* *रेतीचे अवैध परिवहन तत्काळ बंद करण्याची मागणी*

*चोरीचे रेती वाहतुकीने घेतला परत एक जीव*

*रेतीचे अवैध परिवहन तत्काळ बंद करण्याची मागणी*

सावनेर: अवैध रेती वाहतुक करणा-या अज्ञात ट्रॅक्टरक्टर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रँक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत एमएच-40/एबी-9092 क्रमांकाच्या मोटर सायकलला जबर धडक दील्याने या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू तर मागे बसलेला गंभिंर जख्मी आहे.


*सदर घटना दि. 16 फेब्रु.रोजी सावनेर खानगांव रोडवर श्रीकृष्ण मंगल कार्यालया सामोर दु.3ः30 च्या सुमारास घडली. निखील बबनदास महंत (32), रा. खानगांव असे मृतकाचे तर निखील मानकर (20) असे जख्मींचे नांव आहे.*

*सावनेर पासून 2 कि. मी. अंतरावर मौजा खानगांव रोड श्रीकृष्ण मंगल कार्यलय जवळ सावनेर येथे दिनांक 16 फेब्रुवारी ला दुपारचे 3ः30 वा. दरम्यान अवैध रेती वाहतुक करणार्या अज्ञात ट्रँक्टर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रँक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत एमएच-40/एबी-9092 क्रमांकाच्या मोटरसायकला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चालक निखील बबनदास महंत (मृतक) (32) रा. खानगाव ता. सावनेर व त्याच्या पाठीमागे बसलेला निखील मानकर (20) वर्ष रा. सावनेर हे दोघेही जखमी झाले. त्यांना ग्रामीण रूग्णालय सावनेर येथे उपचारा करिता आनले असता निखील बबनदास महंत यास डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.*

*सदर प्रकरणी फिर्यादी अतुल बबनदास महंत रा. खानगाव ता. सावनेर यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे. सावनेर येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279, 338, 304 (अ) भादंवी. सहकलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन अज्ञात वाहन आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.*

*तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रातून अवैधरित्या चोरीचे व परिवाहनाचे प्रकार काही नवीन नाही व अश्यात वरच्यावर अपघात व जीवीत हानीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे यावर स्थानिक राजस्व विभाग व पोलीस विभागासह रस्ते परिवहन विभागाने संयुक्तरीत्या कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …