Breaking News

*राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान पर कार्यक्रम साजरा*

*राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान पर कार्यक्रम साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जी. टाले यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे अधिकारी कैलाश पवार उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अंजली पांडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची आवश्यकता व महत्व प्रतिपादन केले. वाहतुकीच्या नियमाचा प्रसार आणि होणे हा यामागचा उद्देश असल्याचे पांडे म्हणाल्या. आपल्या भाषणातून कैलास पवार यांनी देशभरात राबविण्यात येणाऱ्या या अभियानावर सविस्तर प्रकाश टाकला निष्काळजीपणाने वाहन चालविण्यास आपल्याबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येतो सोबतच हेल्मेटचा वापर सक्तीने करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. टाले यांनी अती वेगाने गाडी चालविणे, वाहतुकीचे नियम न पाळणे ही अपघाताची प्रमुख कारणे होत. आपली सुरक्षा आपल्याच हातात असल्याने वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे टाले यांनी सांगितले कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम संयोजक आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र राऊत यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ गजानन सोमकुवर व महाविद्यालयातील 25 विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …