*शिक्षक मित्र परिवार द्वारा आयोजीत रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान*
विशेष प्रतिनिधी- वर्धा
वर्धा – *शिक्षक मित्र परिवार व निसर्ग सेवा समिती वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्य शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.30 ते 4.30 या वेळेत ऑक्सिजन पार्क आय. टी. आय. टेकडी येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी शिक्षक आमदार मा. श्री व्ही. यु. डायगव्हाणे सर, समिरभाऊ देशमुख, मुरलीधरजी बेलखोडे, महेंद्रजी सालंकार, सतिशजी जगताप, सुरेशकुमारजी बरे, संजयजी इंगळे तिगावकर, अजयजी वानखेडे, चंद्रकांतजी ठाकरे, प्रविणजी भोयर,नगराध्यक्ष अतुलजी तराळे, प्रफुलजी कांबळे, राहुल घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात भासत असल्यामुळे अश्या प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे असे विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व शिक्षक मित्र परिवाराच्या या आयोजनाचे कौतुक केले. प्रास्तविक करतांना प्रमोद खोडे यांनी दरवर्षी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची हमी दिली.*
यावेळी रक्तदानाची सुरुवात महिला प्रतिनिधी म्हणून सौ संगिता प्रमोद खोडे, सौ निशा हितेश कदम यांचे पासून करण्यात आली. तसेच प्रविण पेटकर, रितेश निमसडे, मंगेश भोमले, सागर मसराम, मनोज डेकाटे, वैभव सोनकुसरे, प्रमोद खोडे, प्रफुल कांबळे, हेमंत पारधी, सचिन साटोने, धर्मेश झाडे, योगेश फिरंगे, हितेश कदम, नितीन कांबळे, राहुल चावके, उमेश कापकर, अविनाश भडे, विकास राजूरकर, कुणाल कारवटकर, सौरभ ढोक, विपुल तल्हार, राकेश साटोने, प्रभाकर मडावी, पवन घंगारे, सचिन अलोने, राजेश येळणे, विपीन दौलतकर, अंबरीश वेखंडे, प्रफुल भोयर, प्रकाश मराठे, भूषण मुजबैले, संकेत भंडारकर, निरंजन आंबीलढूके आदींनी रक्तदान केले.यावेळी मयुरी सालंकार, वनमाला मसराम, पांडुरंगजी भालशंकर, उल्हास लोहकरे, हांडे दादा, सुशील गायकवाड, साधना सुरकार, प्रविण देशमुख, श्री हटवार सर, श्री ढाले सर, श्री नाखले सर, मंगेश नारळवार, श्री हासम सर, श्री बाळसराफ सर, श्री पावडे सर, श्री देवतळे सर, श्याम चित्रकार, विठ्ठलभाऊ टेकाम, आरोही खोडे, जस्मिता व शौर्या निमसडे, समन्वि मसराम तसेच मोठ्या संख्येने परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. यावेळी श्री भगत सर यांनी स्वरचित शिवगित सादर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रितेश निमसडे व आभार प्रा. मंगेश भोमले यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज