*कुही शहरात डासांचा हैदोस*

कुही शहर प्रतिनिधी -निखील खराबे
*कुही शहर:- यंदा जिल्ह्यात पावसाने चांगलाच प्रतिसाद दिला यामुळे नदीनाले चांगलेच तुडुंब भरले आहेत. याचा फायदाही तेवढ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना झाला पण कुही शहरात याचा काही वेगळाच त्रास झाला म्हणजेच काही ठिकाणी सांडपाणी जमा झाल्याने डासांच्या संख्येत अमूलाग्र वाढ झाली असून नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत . यामुळे डेंगू, मलेरिया अश्या रोगांची शक्यता नाकारता येणार नाही शहरातील ग्रामीण रुग्णालयातही रुग्णाची संख्या वाढत चालली आहे , पण अद्यापही नगरपंचायत प्रशासनाने डास रोधक फॉगिंग अथवा गटारांत ,नाल्यांत फवारणी केलेली नसावी असेच चित्र दिसत आहे. नगरपंचायत ने स्वछ सर्वेक्षणात भाग घेतला होता त्यामुळे शहरातील सर्वच शेणखड्डे बुजविलेले आहेत पण नाल्यांत आणि गटारांत डासांची पैदास झपाट्याने वाढतच आहे. नाल्या गटारे उपसण्याचे कंत्राट दिलेल्या VRA ने अनेक नाल्यांची सफाईच केलेली नाही अशी ओरड नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकारामुळे कुही शहरातील नागरिक त्रस्त झाले असून नगरपंचायत प्रशासनाने संपूर्ण शहरात फॉगिंग करावी अशी मागणी शहरात जोर धरू लागली आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज