Breaking News

*छावा ग्रुप तर्फे शिवजयंती व मिरवणूक सोहळा उत्साहात साजरा* *गरजु ५० विद्यार्थीना शालेय वस्तू भेट*

*छावा ग्रुप तर्फे शिवजयंती व मिरवणूक सोहळा उत्साहात साजरा*

*गरजु ५० विद्यार्थीना शालेय वस्तू भेट*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोराः दि.19 फेब्रुवारीला आनंदवन चौकाला लागून असलेल्या ग्राउंडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

*छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करून दीप प्रज्वलन करण्यात आले व तसेच आनंदवन चौवकातून मिरवणूक काढण्यात आली यात महाराजांचे देखावे, कोरोना बद्दल जनजागृती, बळीराजा यांचे देखावे तयार करून पालखी काढण्यात आली आणि सांस्कृतिक व व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष ऐतेश्याम अली. कार्यक्रमाचे उद्घाटक छोटू भाई शेख जिल्हाध्यक्ष काँग्रेस अ कामगार. प्रमुख पाहुणे बसंत कुमार सिंग सामाजिक कार्यकर्ते. ऐश्वर्या खामनकर सरपंच बोर्डा ग्रामपंचत प्रिया भोयर सदस्य बोर्डा ग्रा. प.वक्ते श्री प्रशांत काळे ,अंकुश आगलावे, नगरसेवक दिनेश यादव, सुधाकर कुंकुले, शाहीद भाई मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपलं मार्गदर्शनातून महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन करत महाराजांचे विचार देशातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले*

*कार्यक्रमाचे संचालन अरुण कापटे यांनी केले. तसेच जिनाशा वरखडे वय ४ या छोट्या चिमुकलिनी पोवाडा सादर केला राजश्री वैद्य यांनी महिलेवर होणारे अत्याचार या बद्दल विचार मांडले तसेच प्राथमिक उर्दू शाळा वरोरा येथील गरजू ५० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी करिता छावा ग्रुपचे आकाश लिंगडे, तुषार कडू, राहुल ननावरे, निहाल मते शुभम वाकडे व त्यांचे सहकारी या सर्वांनी सहकार्य करू एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे आयोजक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सन्मान व कौतुक केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …