Breaking News

*श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण मध्ये सावनेर पहलेपार वरून मिळाली सगळ्यात मोठी निधी*

*श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण मध्ये सावनेर पहलेपार वरून मिळाली सगळ्यात मोठी निधी*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेर – दि. 21/02/2021 रोजी पहलेपार सावनेर रहिवासी श्री. एस.के. तिवारी जी यांनी सढळ हाताने श्रीराम मंदीर निर्माण करिता निधी समर्पण केला.


*सावनेर शहरात 1 फेब्रुवारी पासून श्रीराम मंदीरासाठी निधी संकलन करण्यासाठी घरोघर संपर्क अभियान राबवित आहे. प्रत्येक घरातून यथाशक्ती निधी संकलन सुरू आहे. बातमी व सोशल मिडियाच्या माध्यमाने याची जनजागृती सुद्धा करण्यात आली होती. अश्याप्रकारे सावनेर शहरात ही रामभक्त अयोध्येत राम मंदिर निर्माण कार्याकरिति सक्रिय कार्य करित असल्याची माहिती सावनेर पहलेपार निवासी श्री. एस. के. तिवारी यांना मिळाली. त्यांनी स्वतः श्री. नरेंद्र ठाकुर यांना दूरध्वनी वरून संपर्क करून संपूर्ण टोळीला आपल्या राहत्या वाड्यात आमंत्रित केले. ठरल्याप्रमाणे श्री. नरेंद्र ठाकुर, जगदीश खंगारे, मोहन कछवाह, ॲड. मनोज खंगारे, ॲड. अभिषेक मुलमुले, तुषार उमाटे, श्रीरामजी आवदे, नीलकंठजी खडसे, लक्ष्मीकांत पोटोडे, कुलभूषण नवधिंगे आणि अभिषेकसिंह गहरवार यांना 21000 रूपयांचा धनादेश दिला.*


*श्री. राम मंदीर निधी संकलन समितीच्या वतीने सर्व दिनदात्यांसह श्री तिवारी यांचेही आभार मानन्यात आले.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …