Breaking News

*नगर परिषद प्रशासना च्या लापरवाही कार्यामुळे नागरिक त्रस्त*

*नगर परिषद प्रशासना च्या लापरवाही कार्यामुळे नागरिक त्रस्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत येणार्या प्रभाग क्रमांक ७ च्या मटन मार्केट परिसरातुन पटेल नगर कडे जाणारा पांधन मार्ग वारंवार खराब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असुन नगर परिषद प्रशासन गेल्या काही दिवसान पासुन फक्त मार्गाची लिपापोती करीत आहे .

सुत्रा नुसार मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २३ ला मटन मार्केट परिसरातुन दहा चक्का ट्रक गेल्याने पटेल नगर मार्ग तुटल्याची व नळाची पाईप लाईन फुटल्याची माहिती नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , व नगरसेविका रेखा टोहणे यांनी घटनास्थळी पोहचुन मार्गाची पाहणी केली असता मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी तुरंत तुटलेल्या मार्गाचे दुरुस्ती व फुटलेल्या पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करण सुरु करण्याचे आदेश दिले . ह्या मार्गावरुन दररोज छोटे मोठे वाहन , नागरिक जाने येणे करीत असतात परंतु या मार्गावरुन जड़ वाहन जात असल्याने हा मार्ग वारंवार तुटत आहे त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे . ह्या मार्गावरुन जड वाहन बंद करुन उडानपुल बनवन्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे .

नळाची पाईप लाईन फुटल्याने कन्हान शहरात पाण्याचा समस्या निर्माण झाले असुन नागरिक बुंद बुंद पाण्यासाठी भटकत असुन फुटलेल्या पाण्याची पाईप लाईन तुरंत दुरुस्ती करुन नियमित नळ सोडावे अशी मागणी होत आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …