Breaking News

*कामगार कल्याण केंद्र खापरखेडा तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न*

*कामगार कल्याण केंद्र खापरखेडा तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न*


नागपुर उपजिल्हा‌ प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कामगार कल्याण मंडळ प्रकाश नगर वसाहत खापरखेडा येथील केंद्रा तर्फे दिनांक २३/२/२०२१ रोजी मनोरंजन गृह क्रमांक २ येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उदघाटन खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजु घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत उपस्थित होते तर गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त पुरुषोत्तम मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले.


याप्रसंगी मंचावर‌ उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या जिवन कार्याबद्दल माहिती देऊन रक्तदान श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले कामगार कल्याण केंद्र वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवित असल्याचे सांगून मुख्य अभियंता यांनी कामगार केंद्राच्या कार्याला शुभेच्छा दिल्या सदर रक्तदान शिबिर कार्यक्रमात १५ रक्तदात्यानी रक्तदान केले.

रक्त संकलन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चमूनी केले डॉ.संदिप महाकाळकर, डॉ.अनिता सरदेशपांडे, वेणुताई तुरणकर, राजु उप्पलवार, रुचिता बिरे यांनी रुग्णालयाच्या वतीने सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार कामगार प्रभारी कामगार विकास अधिकारी प्रतिभा भाकरे यांनी केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र महिला कल्याण सहाय्यक शालू टेकाडे, मंदा सोनुरकर, नलिनी बेंडेकर, नरेश तरारे, सुनील ऊके, आशिष भालेराव, रुपल टेकाडे, वैशाली अंडसकर, प्रमोद चव्हाण, बागडे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …