Breaking News

*कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे संत गाडगे बाबा यांची जयंती केली साजरी*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे संत गाडगे बाबा यांची जयंती केली साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थितिंना संत गाडगे बाबा यांचा जीवना वर मार्गदर्शन करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात कन्हान – पिपरी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , व नप कर्मचारी उपस्थित होते .

*कामठी मध्ये भाजपा द्वारे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी केली*

कामठी – भाजपा कामठी शहर द्वारे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात सर्व भाजपा पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी भाजपा कामठी शहराचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …